PM मोदीजी, बँकांना सांगा माझ्याकडून पैसे घेण्यास- विजय मल्ल्या

PM मोदीजी, बँकांना सांगा माझ्याकडून पैसे घेण्यास- विजय मल्ल्या

भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्याने थेट पंतप्रधान मोदींनाच त्याच्याकडून पैसे घेण्याचे आवाहन केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्याने थेट पंतप्रधान मोदींनाच त्याच्याकडून पैसे घेण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी बँकांना माझ्याकडून पैसे घेण्यास सांगावे, असे मल्ल्याने ट्विटरवर म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी 16व्या लोकसभेत अखेरच्या भाषणात एक व्यक्ती 9 हजार कोटी रुपये घेऊन पळून गेला असा उल्लेख केला. मला वाटते की ते माझ्यासंदर्भातच बोलत होते. मी मोदींना विचारू इच्छितो की, ते बँकांना माझ्याकडून पैसे घेण्यास का सांगत नाहीत. यामुळे कमीत कमी सार्वजनिक निधीमधील पैसा रिकव्हर होईल. मी याआधीच कर्नाटक उच्च न्यायालयात सेटलमेंटची ऑफर दिली आहे, असे मल्ल्याने ट्टिवटरवर म्हटले आहे.

पीएम मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना मल्लावर हल्ला चढवला होता. तेव्हा देखील पंतप्रधांनी कोणाचे नाव घेतले नव्हते. जो लोक पैसे घेऊन देशातून पळून गेले आहेत. ते आता ट्विवटरवर सांगत आहेत की मी तर 9 हजार रुपये घेतले होते आणि आता मोदींनी माझे 13 हजार कोटी रुपये जप्त केले आहेत, असे मोदी म्हणाले होते.दरम्यान, विजय मल्ल्याच्या प्रत्यर्पणासाठी इंग्लंडच्या गृह मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. प्रत्यर्पणाच्या आदेशावर गृह सचिव औपचारिकरित्या स्वाक्षरी केली आहे. यावर मल्ल्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करु शकतो. विजय मल्ल्यावर 9 हजार 400 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याच्या विरोधात 17 बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


संजय राऊतांचा 'यु-टर्न', स्वबळाची तलवार म्यान करून आता मोठ्या भावाचा नारा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 01:54 PM IST

ताज्या बातम्या