Home /News /national /

Engineer's Day 2021: नक्की कोण होते 'सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या?'; का साजरा केला जातो हा दिवस? वाचा

Engineer's Day 2021: नक्की कोण होते 'सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या?'; का साजरा केला जातो हा दिवस? वाचा

हा दिवस नक्की कशासाठी साजरा केला जातो? आणि या दिवसाचं नक्की महत्त्वं काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

    मुंबई, 15 सप्टेंबर: 15 सप्टेंबर हा दिवस भारतात दरवर्षी 'राष्ट्रीय अभियंता दिवस' (Engineers day 2021) म्हणून साजरा केला जातो. अनेक इंजिनिअर्स या दिवशी एकमेकांना शुभेच्छा (engineers day in india) देतात. मात्र हा दिवस नक्की कशासाठी साजरा केला जातो? आणि या दिवसाचं नक्की महत्त्वं काय? (why is engineers day celebrated) हे आपण आज जाणून घेणार आहोत. 15 सप्टेंबर हा दिवस सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (Mokshagundam Visvesvaraya details) यांच्या जयंतीनिमीत्त साजरा केला जातो. देशातील सर्वात दूरदर्शी आणि प्रख्यात सिव्हिल इंजिनिअर्सपैकी एक असलेल्या सर एम. विश्वेश्वरय्या यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतानं राष्ट्रीय अभियंता दिन (Happy engineers day) साजरा करण्यासाठी 15 सप्टेंबरची निवड केली. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (Bharatrana Mokshagundam Visvesvaraya) यांना प्रमुख राष्ट्र-निर्माते मानलं जातं. भारताप्रमाणे श्रीलंका आणि टांझानिया हे देशही हा दिवस साजरा करतात. नक्की कोण होते एम. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय अभियंता दिन हा भारतातील सर्वात यशस्वी नागरी अभियंता, धरण बांधणारा, अर्थतज्ज्ञ, राजकारणी, सर एम. विश्वेश्वरय्या यांची जन्मतारीख आहे. 15 सप्टेंबर 1860 रोजी ऑर्थोडॉक्स तेलुगु ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या एम. विश्वेश्वरय्या यांनी मद्रास विद्यापीठातून कला शाखेतील पदवी घेतली. यानंतर त्यांनी  पुण्याच्या विज्ञान महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. 34 वर्षांच्या कारकीर्दीसह, त्यांची पहिली नोकरी मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून होती. सर एम. विश्वेश्वरय्या नंतर  म्हैसूरचे दिवाण बनले. म्हैसूरमधील कृष्ण राजा सागर धरणाच्या बांधकामाचे ते मुख्य अभियंता होते, तसंच  हैदराबाद शहरासाठी पूर संरक्षण प्रणालीचे मुख्य डिझायनर होते. त्याच्या कार्यानं लोक खुश झाले आणि  त्यांना "आधुनिक म्हैसूरचे जनक" हा दर्जा मिळाला. "Work From Home बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल"; हर्ष गोयंकांना महिलेची विनंती; वाचून येईल हसू काही उल्लखनीय पावलं 1899 मध्ये दख्खन कालव्यांमध्ये सिंचनाची ब्लॉक प्रणाली आणि हैदराबादमधील पूर संरक्षण व्यवस्था विकसित करणं यामध्ये त्यांचा प्रमुख वाटा होता. तसंच 1903 मध्ये पुण्यातील खडकवासला जलाशयामध्ये सुरुवातीला बसवलेल्या स्वयंचलित पाण्याचे दरवाजे नंतर पेटंट झाले आणि भारत सरकारनं त्यांच्या कार्यासाठी त्यांना 'भारतरत्न' देऊन सन्मानित केले. मिळालेले काही सन्मान भारत सरकारने औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांना 1955 मध्ये सर्वोच्च नागरी सन्मान - भारतरत्न देऊन सन्मानित केलं. तत्कालीन राजा जॉर्ज पंचम यांनी ब्रिटिश नाइटहुडसह सन्मानित केलं तसंच त्यांना 'सर' ही पदवी देण्यात आली.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या