AIRSTRIKE साठी 26 फेब्रुवारीच का? ही नवीन माहिती आली पुढे

AIRSTRIKE साठी 26 फेब्रुवारीच का? ही नवीन माहिती आली पुढे

भारताने ही कारवाई 26 फेब्रुवारीलाच का केली? याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. संरक्षण तज्ज्ञांनीही याविषयी आपली मतं नोंदवली आहेत. प्रत्यक्षात 26 फेब्रुवारीचा दिवस अगोदरच ठरला होता का, याविषयी नवीन माहिती हाती येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर 12 दिवसातच भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला.  भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान हादरला आहे. भारताने ही कारवाई 26 फेब्रुवारीलाच का केली? याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. संरक्षण तज्ज्ञांनीही याविषयी आपली मतं नोंदवली आहे. पण प्रत्यक्षात 26 फेब्रुवारीचा दिवस अगोदरच ठरला होता का? याविषयी नवीन माहिती हाती येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुदलाने जैशच्या तळांवर एअरस्ट्राईक करण्याची तयारी 2- 3 दिवसांपूर्वीच पूर्ण केली होती. खरं तर तीन दिवसांपूर्वीच ही कारवाई होणं अपेक्षित होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 फेब्रुवारीला दिल्लीत राष्ट्रीय शहीद स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमापू्र्वीच एअर स्ट्राईक करायची वायुदलाची तयारी होती. पुलवामा हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्याची इच्छा होती.

राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनापूर्वी ती संधी हवाईदलाला मिळाली नाही, कारण पाकिस्तानच्या ज्या भागात जैशचे तळ होते, तिथलं हवामान अगदी वाईट होतं. हिमवर्षाव सुरू होता. त्यामुळे हवाईदलाला हवी तशी संधी मिळाली नाही. पाकिस्तानात घुसून कारवाई करण्यासाठी किमान बरं हवामान असणं आवश्यक होतं. ही संधी 26 तारखेच्या रात्री मिळाली.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी आपला ट्रेनिंग कॅम्प सुरू करणार आहेत, याबाबत 16 फेब्रुवारीला भारतीय गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांच्या दोन महिने चालणाऱ्या या ट्रेनिंग कॅम्पला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती.

दहशतवाद्यांच्या या कॅम्पमध्ये अनेक मोठ्या कमांडरसह या कॅम्पमध्ये जवळपास 500 जण सहभागे झाले होते. भारताला ही माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण तयारीनिशी भारतीय वायूसेनेनं 26 फेब्रुवारीच्या पहाटे हा हल्ला केला.

अत्यंत गुप्तपणे भारतीय वायूसेनेनं पहाटे 3:30 वाजता हा हल्ला केला. अवघ्या 3 ते 4 मिनिटात भारतीय लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मिरात प्रवेशात केला. 2300 किलोमीटर या वेगानं मिराज विमानं हल्ला करण्यासाठी गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 10:11 PM IST

ताज्या बातम्या