दिल्ली, 14 जानेवारी : एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा कोर्ट फाशीची शिक्षा सुनावते, त्यानंतरची प्रक्रिया काही साधी नसते. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातल्या नराधमांना कोर्टाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर किती कायदेशीर प्रक्रिया पार पडली हे लक्षात असेल. याचिका, फेरयाचिका, दयेचा अर्ज असं करत आता निर्भयाच्या अपराध्यांना फासावर लटकवलं जाणार आहे. निर्भयाच्या गुन्हेगारांना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे. एकाच वेळी चौघांना फासावर लटकवण्याची वेळ बऱ्याच वर्षांनी आली आहे. कशी असते फाशी देण्याआधीची प्रक्रिया?
देशात कोर्टाच्या आदेशानंतर संबंधित आरोपीला फाशी दिली जाते. मात्र ज्याला फाशीची शिक्षा झाली आहे. त्या आरोपीला फाशी देण्याच्या आधी गंगाराम नावाच्या पुतळ्याला फासावर लटकवलं जातं. त्यानंतर संबंधित आरोपीला फाशी दिली जाते. गंगाराम पुतळ्याची निर्मिती का आणि कुणी केली याची माहिती नाहीये. पण फाशी देण्याचा आधी प्रत्येक तुरुंगात गंगारामला फाशी देण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आजही कायम आहे. दिल्लीतील निर्भयाच्या मारेकऱ्यालाही अशाचा प्रकारे फासावल लटकवलं जाणार आहे.
फाशीच्या पहिले गंगारामला का मारलं जातं?
कोणत्याही आरोपीला फासावर लटकवण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक तुरुंगात आरोपीला फासावर लटकवण्याच्या पद्धतीचं पालन केलं जातं. फाशी देण्याआधी फाशीचं प्रत्याक्षीक केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून पहिले गंगारामला मारलं जातं. फाशी दिल्या जाणाऱ्या प्रत्येक तुरुंगात गंगारामचा पुतळा तयार करण्यात येतो. ज्या व्यक्तीला फाशी द्यायची आहे. त्या व्यक्तीच्या वजनाच्या दीडपट जास्त वजन असलेला पुतळा तयार केला जातो. फाशी देणारी दोरी तपासली जाते. एकूणच काय तर प्रत्यक्ष फाशी देण्याआधी डमी फाशी दिली जाते. डमी फाशी यशस्वी झाल्यानंतर संबंधीत व्यक्तीला फासावर लटकवलं जातं.
गंगारामच नाव का?
प्रत्यक्षा फाशी देण्याआधी डमी फाशी देणाऱ्या पुतळ्याचं नाव गंगारामच का ठेवलं याची कसलीही अधिकृत माहिती नाहीये. मात्र अनेक वर्षांपासून गंगाराम पुतळा तयार करून त्याला फाशी देण्याची परंपरा आहे. तीच परंपरा आजही प्रत्येक तुरुंगात पाळली जातं असल्याचं सांगण्यात येतं. पहिल्यांदा डमी पुतळ्याला गंगाराम नाव कुणी दिलं याची माहिती कुणालाही माहित नाही. उघड्या डोळ्यांनी फाशीची प्रक्रिया पाहणारे पत्रकार गिरीजाशंकर यांनी 'आंखो देखी फाशी' या पुस्तकात गंगारामला मारण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं सांगितलं.
कशी सुरू झाली गंगारामला मारण्याची परंपरा?
एका तुरुंगात सुरू झालेली परंपरा दुसऱ्या तुरुंगात गेली आणि ती परंपरा सर्वत्र पसरल्याची गंगारामच्या पुतळ्याला फाशी देणाऱ्या लोकांनी सांगितलं आहे. तुरुंगातील इतर कैद्यांनी एका लाकडाला पुतळ्याचं रूप दिलं. पुतळ्याच्या हाताच्या आणि पायाच्या जागी रेतीचे पोती बांधण्यात येते. त्या पुतळ्याचं वजन फाशी देण्यात येणाऱ्या कैद्याच्या वजनाच्या दीडपड करण्यात येतं. आणि त्यानंतर त्या पुतळ्याला फासावर लटकवण्यात येतं. पुतळ्याला लावण्यात आलेली फाशी यशस्वी झाल्यानंतर आरोपीला फाशी देण्यात येते.
फाशीच्या वेळी 5 लोक उपस्थित
फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येते त्या वेळी तिथे केवळ 5 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असते. म्हणजे आरोपीला फाशी देताना केवळ 5 जणच पाहू शकतात. यात तुरुंग अधिक्षक, तुरुंगातील उपआधिक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, न्यायाधीश, या शिवाय फासीची शिक्षा झालेल्या व्यक्तीची इच्छा असेल तर त्याच्या धर्मातील कोणताही व्यक्ती उपस्थित राहू शकतो.
हेही वाचा, मुंबईत रेल्वे सुरक्षा रक्षकाने केला टॅक्सी चालकावर अनैसर्गिक अत्याचार
हेही वाचा, ट्रेनरने Gym मालकावर सत्तुरने केले सपासप 17 वार, हत्येचा थरकाप उडवणार VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.