या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारयात्रा काढल्या. त्यांच्यावर राहुल गांधींनी पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. प्रियांका गांधींची लोकप्रियता आणि पुढच्या लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय, असं बोललं जातं.
काँग्रेसच्या स्टार प्रचारक म्हणून प्रियांकांची बरीच चर्चा आहे पण त्याचबरोबर त्यांच्यावर एक 'बायोपिक' काढण्यात आला होता हे खूप कमी जणांना माहीत आहे. ही घटना आहे तब्बल 19 वर्षांपूर्वीची आणि या फिल्ममध्ये प्रियांकाच्या भूमिकेत होती अभिनेत्री प्रियांका चोप्रा.
प्रियांका गांधी त्यावेळी २८ वर्षांच्या होत्या.त्यांच्यावरचा हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये येणार होता. पण निर्मात्याला आर्थिक अडचणी आल्याने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. या फिल्ममध्ये पूजा बात्रा आणि राहुल देव यांच्याही भूमिका होत्या.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा चित्रपट रिलीज होणार आहे. जर प्रियांका गांधींवरचा हा चित्रपट पूर्ण झाला असता तर काँग्रेसला त्याचा फायदा झाला असता, अशी चर्चा आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या आखाड्यात प्रियांका गांधी आणि नरेंद्र मोदी यांची लढत पाहायला मिळणार आहे. प्रियांका गांधी त्यांच्या बोटयात्रेमुळे आधीच चर्चेत आहेत. आता त्या मोदींसह आणखी विरोधकांना कशी टक्कर देतात ते पाहावं लागेल.
भारताच्या भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे, असं म्हणत बेरोजगारी आणि गरिबीच्या मुद्द्यावरून प्रियांका गांधींनी मोदींवर हल्ला चढवला होता. त्यांच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी गुजरातमधून केली आणि त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित केलं.
=========================================================================================================================================================================
VIDEO मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर होती - सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.