सदैव तरुण दिसण्याचा अट्टहास कशासाठी? श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न

सदैव तरुण दिसण्याचा अट्टहास कशासाठी? श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न

श्रीदेवींच्या अकाली एक्झिटनं सर्वांनाच चटका लागला. पण एक वेगळीच चर्चा सुरूय. तरुण दिसण्यासाठी श्रीदेवींनी सर्जरी केल्या होत्या का ? त्यांच्यावर कोणती हॉर्मोनल थेरपी सुरू होती का ?

  • Share this:

25 फेब्रुवारी : श्रीदेवींच्या अकाली एक्झिटनं सर्वांनाच चटका लागला. पण एक वेगळीच चर्चा सुरूय. तरुण दिसण्यासाठी श्रीदेवींनी सर्जरी केल्या होत्या का ? त्यांच्यावर कोणती हॉर्मोनल थेरपी सुरू होती का ? आणि यामुळेच त्यांचं अकाली निधन झालं का?

श्रीदेवींच्या जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला. पण एक वेगळीच चर्चा आता सुरू झालीये. तरुण दिसण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियांमुळे त्यांना त्रास झाला का ? सोशल मीडियावर याबाबत अनेक लेख फिरतायेत. आम्ही या कोणत्याही लेखाची किंवा चर्चेची पुष्टी करत नाहीये. पण याची चर्चा झाली पाहिजे, की   तरुण दिसण्याच्या अट्टहासापायी चाळिशीतल्या किंवा पन्नाशीतल्या महिला आपला जीव धोक्यात घालतायत का ? निसर्गाच्या विरोधात जाऊन आपलं आयुष्य कमी करून घेतायेत का ? साठीकडे वाटचाल करणाऱ्या महिलेनंही तरुण दिसलं पाहिजे, याचा दबाव समाज महिलांवर टाकतोय का ? सदैव तरुण दिसण्यासाठी माणूस निसर्गाच्या विरोधात जातोय का ? याचं उत्तर प्रत्येकानं शोधायचंय.

श्रीदेवींवर हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपीची ट्रीटमेंट सुरू होती, अशीही चर्चा आहे. त्यांनी ओठांची सर्जरी करून घेतली होती, असंही बोललं जातं. प्रश्न असा आहे की हे खरं असेल तर ते त्यांना का करावंसं वाटलं ? वय वाढणं, किंवा वृद्ध होणं भारतीय समाजात अजूनही सुरळीत किंवा सुखकर नाहीये का ? हॉलिवूडमधल्या दिग्गज अभिनेत्री मेरील स्ट्रीप जर त्यांचं वय लपवण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत, तर मग भारतीय अभिनेत्रींना तसं करावंसं का वाटतं ? भूमिका मिळणार नाहीत असं वाटतं ? की तारुण्यातला लूक आताही तसाच राहिला पाहिजे, हा वेडा हट्ट असतो ? विषय गंभीर आहे, आणि जीवावरही बेतू शकतो. यापासून दूर राहिलेलंच बरं.

शेवटी काय, माणसाचे विचार, त्याचं किंवा तिचं काम आणि स्वभाव, हे महत्त्वाचं. बाह्यरूप बदलणारंच. निसर्गाचा कायदाच आहे तसा.

First published: February 25, 2018, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading