• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मतभेद असूनही राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूंना का दिला होता ‘भारतरत्न’ सन्मान? 'या' पुस्तकात झाला खुलासा

मतभेद असूनही राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूंना का दिला होता ‘भारतरत्न’ सन्मान? 'या' पुस्तकात झाला खुलासा

राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूंना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी (India’s highest civilian award) पुरस्कार प्रदान केला होता.

 • Share this:
  आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Neharu) यांना भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद (Dr. Rajendra Prasad) यांनी याबाबत घोषणा केली होती. तसंच, या निर्णयाची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. नेहरू आणि प्रसाद यांच्यामध्ये कितीतरी मुद्द्यांवर टोकाचे मतभेद (Neharu and Dr. Prasad) होते. असं असतानाही राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूंना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी (India’s highest civilian award) पुरस्कार प्रदान केला होता. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई (Rasheed Kidwai) यांनी आपल्या ‘भारत के प्रधानमंत्री : देश, दशा, दिशा’ (Rasheed Kidwai book) या पुस्तकात याबाबत माहिती दिली आहे. राजकमल प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात त्यांनी देशाला लाभलेल्या पंतप्रधानांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकात असं म्हटलं आहे, की 1955 हे भारतरत्न पुरस्कारांचं दुसरंच वर्ष होतं. त्या वर्षी पंतप्रधान नेहरूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार जाहीर करण्यात आला तेव्हा नेहरू युरोप दौऱ्यावर होते. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) यांनी अध्यादेश जारी करून हा पुरस्कार जाहीर केला होता. तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद आणि नेहरू यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद होते; मात्र तरीही प्रसाद यांनी या पुरस्कार घोषणेची संपूर्ण जबाबदारी (Bharat Ratna to Neharu) स्वीकारली. 15 जुलै 1955 रोजी याबाबत बोलताना राजेंद्र प्रसाद म्हणाले होते, 'हा निर्णय मी माझ्या मनाने, आपल्या पंतप्रधानांचा कोणताही सल्ला वा परवानगी न घेता घेतला आहे. त्यामुळे कदाचित हा निर्णय असंवैधानिक असू शकतो; मात्र मला माहिती आहे, की माझ्या या निर्णयाचं अगदी उत्साहानं स्वागत केलं जाईल.' हे वाचा -  स्वातंत्र्यसेनानी उषा मेहतांवर बनणार बायोपिक! 'या' अभिनेत्रींची नावं चर्चेत 'त्याच वर्षी पंतप्रधान नेहरूंसोबतच दार्शनिक भागवत आणि एम. विश्वेश्वरय्या यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर 1955 रोजी एका सोहळ्यात या सर्वांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी इतरांचं आपापल्या क्षेत्रातलं योगदान वाचून दाखवण्यात आलं; मात्र नेहरूंचं (India’s first PM) समाजासाठी एवढं योगदान होतं, की त्याचा उल्लेख करणं अगदीच अवघड काम होतं. त्यामुळे त्यांचं केवळ नावच पुकारण्यात आलं. पुरस्कार घेण्यासाठी ते मंचावर उपस्थित होताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला होता,' असंही या पुस्तकात म्हटलं आहे. यानंतर 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi Bharat Ratna) यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 1971ला पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या पुस्तकात म्हटलं आहे, की ज्याप्रमाणे 1955ला तत्कालीन राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती, त्याचप्रमाणे 1972मध्येही तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी (V.V. Giri) यांनी इंदिराजींना भारतरत्न देण्याची घोषणा केली. तसंच, गिरी यांनी इंदिरा गांधींना हा पुरस्कार देण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. रशीद किडवई आपल्या पुस्तकात म्हणतात, की या दोन्ही पंतप्रधानांनी आपापल्या कालावधीतल्या राष्ट्रपतींचं हे ऋण त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन फेडलं. 1962मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतिपदावरून निवृत्त (Rajendra Prasad Bharat Ratna) झाले. त्यानंतर त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसंच, गिरी (V.V. Giri Bharat Ratna) यांचा कार्यकाळही 1974 साली पूर्ण झाला आणि 1975 साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
  First published: