News18 Lokmat

भाजपच्या उमेदवार यादीला एवढा उशीर का ?

भाजपला देशभरातल्या 200 उमेदवारांची यादी एकत्र जाहीर करायची असल्यामुळे याला उशीर होतोय, अशी माहिती आहे. या उमेदवार यादीवर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा लक्ष ठेवून आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 05:24 PM IST

भाजपच्या उमेदवार यादीला एवढा उशीर का ?

प्रशांत लीला रामदास

नवी दिल्ली, 20 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार, अशी बातमी या आठवड्यात अनेकदा आली पण यादी काही जाहीर झाली नाही. होळीचं दहन झाल्यानंतरच्या शुभमुहूर्तावर ही यादी जाहीर करायची, असं पक्षाने ठरवलं होतं. या याद्या अंतिम करण्यासाठी पक्षाच्या बैठकाही सुरूच होत्या. पण काही ना काही कारणाने याला उशीर झाला.

भाजपला देशभरातल्या 200 उमेदवारांची यादी एकत्र जाहीर करायची असल्यामुळे याला विलंब होतोय, अशी माहिती आहे. या उमेदवार यादीवर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा लक्ष ठेवून आहेत. सगळीकडे होळीचा उत्साह असताना मोदी आणि अमित शहांची बुधवारी याबद्दल दोन तास बैठकही झाली.

उमेदवार यादी ठरवण्याच्या बैठका, चर्चा सुरू असतानाच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं. त्यामुळे ही चर्चा लांबणीवर पडली. त्यातच गोव्याच्या सरकारस्थापनेमध्येही भाजपचे बडे नेते गुंतलेले होते.

6 जागांसाठी चर्चा

Loading...

उमेदवार यादी जाहीर झाली नसली तरी ज्या उमेदवारांना तिकिट मिळणार आहे त्यांना तयारीला लागा, अशा सूचना गेलेल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ नाही. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला आधीच ठरलेला आहे. त्यामुळे ते मतभेदही मिटले आहेत.

जिथे भाजप - शिवसेनेचे खासदार नव्हते अशा 6 जागांच्या उमेदवार निवडीसाठी भाजपमध्ये चर्चा सुरू होती. हिंगोली, नांदेड, बारामती, कोल्हापूर, माढा, हातकणंगले या जागा काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मित्रपक्षांकडे होत्या. त्या जागांवर भाजपला खबरदारीने उमेदवार द्यायचा आहे.

सोलापूर आणि लातूर अशा जागांवर उमेदवार बदलावे लागणार आहेत. या एकेक जागेचा विचार राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवरही केला जातोय. राज्यातल्या उमेदवार यादी ठरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर सोपवण्यात आली होती. आता जी यादी जाहीर होणार आहे त्यात महाराष्ट्रातल्या बहुतांश उमेदवारांची नावं असतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

=====================================================================================================


VIDEO : 'खासदार व्हायचं म्हणून जमीन विकली'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: BJP
First Published: Mar 21, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...