'राष्ट्रपतींना पाठवलेलं ते पत्र नेमकं लिहिलं कुणी ? माजी सेनाधिकाऱ्यांचा पत्राला आक्षेप

सैन्यदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलं आहे. सैन्य दलाचा उपयोग हा राजकारणासाठी होतो आहे, असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं असल्याची बातमी आली होती पण आता या अधिकाऱ्यांपैकी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं पत्र लिहिल्याचं नाकारलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 03:51 PM IST

'राष्ट्रपतींना पाठवलेलं ते पत्र नेमकं लिहिलं कुणी ? माजी सेनाधिकाऱ्यांचा पत्राला आक्षेप

नवी दिल्ली, 12 एप्रिल : सैन्यदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलं आहे. सैन्य दलाचा उपयोग हा राजकारणासाठी होतो आहे, असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं असल्याची बातमी आली होती पण आता या अधिकाऱ्यांपैकी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं पत्र लिहिल्याचं नाकारलं आहे. यात दोन माजी सेनाप्रमुखांचाही समावेश आहे.

निवडणुकीच्या काळात राष्ट्रपतींना असं पत्र लिहिलं गेल्यामुळे खळबळ माजली आहे. पण आता या सेनाधिकाऱ्यांनीच ही गोष्ट नाकारली आहे. या पत्रावर 150 सेनाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. राष्ट्रपती हे तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असल्याने त्यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्धही तक्रार करण्यात आली आहे.

मोदीजी के सेना

योगी आदित्यनाथ यांनी सैन्याचा उल्लेख मोदीजी की सेना असा केला होता. त्यांच्या या वक्तव्याला या निवृत्त सेनाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. या पत्रावर 156 निवृत्त सेनाधिकाऱ्यांची नावं आणि सह्या आहेत.पण या यादीत पहिलंच नाव असलेले माजी सैन्यदलप्रमुख सुनिथ फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांनी ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.

'माझ्या पूर्ण आयुष्यात मी राजकारणापासून दूर राहिलो. माझ्या 42 वर्षांच्या कारकिर्दीनंतरही माझी ही भूमिका बदललेली नाही', असं माजी सैन्यदलप्रमुख सुनिथ फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांनी म्हटलं आहे.

Loading...

पत्रासाठी सहमती नाही

हे पत्र कुणी लिहिलं हेच मला माहिती नाही, असं ते ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. हवाई दलाचे माजी प्रमुख एन. सी. सुरी यांनीही हेच म्हटलं आहे. त्यांचं नाव या यादीत आठवं आहे. सैन्यदलांनी राजकीय भूमिका घेऊ नये, अशी भूमिका मी मांडली होती. पण या पत्रासाठी माझी सहमती घेण्यात आली नव्हती,असं ते म्हणाले.

हे पत्र कुणीतरी मेजर चौधरी यांनी लिहिलं आहे. व्हॉट्स अॅप आणि इ मेलवरून ते व्हायरल होत आहे, असंही सुरी म्हणाले.

लष्कराने राजकीय भूमिका घेऊ नये आणि निवडून आलेल्या सरकारला पाठिंबा द्यावा, असं मी लिहिलं होतं. आणि या पत्रासाठी माझी सहमती घेण्यात आली नव्हती. माझं म्हणणं चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

=====================================================================================================================================================================

VIDEO अक्षरमंत्र, भाग-6 : असं काढा सुंदर अक्षर; आजची अक्षरं - अ, आ, इ, ई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 03:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...