News18 Lokmat

कमी मतदान झालं तर विजय कुणाचा? काय आहे तज्ज्ञांचं मत?

मतदान जास्त झालं तर लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी आहे, असं बोललं जातं आणि मतदान कमी असेल तर सत्ताधाऱ्यांना जनतेचा पाठिंबा आहे, असं मानतात पण यावर राजकीय तज्ज्ञांचं मत मात्र वेगळं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 06:38 PM IST

कमी मतदान झालं तर विजय कुणाचा? काय आहे तज्ज्ञांचं मत?

नवी दिल्ली, 19 एप्रिल : या लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण कमी झालं आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सरासरी दोन टक्क्यांनी मतदान कमी झाल्याचं समोर आलं.

लोकसभेच्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे आता लगेचच आकडेमोड सुरू झाली आहे. मतदान जास्त झालं तर लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी आहे, असं बोललं जातं आणि मतदान कमी असेल तर सत्ताधाऱ्यांना जनतेचा पाठिंबा आहे, असं मानतात.


यावर राजकीय तज्ज्ञांचं मत मात्र वेगळं आहे. मतदानाची वाढलेली किंवा घटलेली टक्केवारी आणि सत्ताधाऱ्यांबद्दलची नाराजी यांचा संबंध नाही. मतदानामध्ये सहा किंवा सात टक्क्यांचा फरक असला तरच काही निष्कर्ष काढता येईल, असं तज्ज्ञ म्हणतात.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोसायटी अँड पॉलिटिक्स या संस्थेचे प्राध्यापक ए. के. वर्मा यांच्या मते, मतांची टक्केवारी घटणं आणि वाढणं याचा सत्ताधारी पुन्हा जिंकून येतील की नाही याच्याशी संबंध नाही. हे सिद्ध करण्यासाठी ते मध्य प्रदेशचं उदाहरण देतात.

Loading...


मध्य प्रदेशमध्ये तेव्हा सत्ताबदल

2013 च्या तुलनेत 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीत 3 टक्के जास्त मतदान झालं. पण हे वाढलेलं मतदान सत्ताविरोधीही नव्हतं आणि सत्तेच्या बाजूनेही नव्हतं.काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही सारखीच मतं पडली. मध्य प्रदेशमध्ये 2003 साली 7.2 टक्क्यांनी मतदान वाढलं होतं. तेव्हा मात्र काँग्रेसला हटवून भाजप सत्तेत आलं.

लोकांची उदासीनता हे मतदान कमी होण्याचं कारण आहे, असं म्हटलं जातं. पण आता तर नोटा चा पर्याय आहे. उमदेवारांपैकी कुणालाही पसंती द्यायची नसेल तर मतदार हा पर्याय निवडू शकतात.


'नोटा'मुळे भाजपचं नुकसान

मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नोटाचा वापर करून भाजपला संदेश दिला. हीच मतं भाजपला मिळाली असती तर भाजपचे 11 उमेदवार निवडून आले असते.

मतदान न करण्यामागे राजकीय किंवा सामाजिक कारणं असतात. जेव्हा मतदारांपुढे फारसा पर्याय नसतो तेव्हाही सत्ताधाऱ्यांना विजय मिळण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीतही मतदार उदासीन असतात तर काही वेळा मतांच्या ध्रुवीकरणामुळे जास्त मतदान होतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

===========================================================================================

VIDEO : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पोहोचल्या मंदिरात, घेतला हा पवित्रा!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2019 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...