News18 Lokmat

कन्हैयाकुमारच्या उमेदवारीमुळे बेगुसराय बनलं 'हॉट सीट'

बिहारमधल्या बेगुसरायमधले डाव्या पक्षांचे उमेदवार आणि जेएनयूचे विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार आणि भाजपचे उमेदवार गिरीराज सिंह यांच्यातल्या लढाईकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बेगुसरायमधल्या लढतीत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तनवीर कुठेच नाहीत, असं कन्हैयाकुमार यांचं म्हणणं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 06:54 PM IST

कन्हैयाकुमारच्या उमेदवारीमुळे बेगुसराय बनलं 'हॉट सीट'

बिहारमधल्या बेगुसरायमधले डाव्या पक्षांचे उमेदवार आणि जेएनयूचे विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार आणि भाजपचे उमेदवार गिरीराज सिंह यांच्यातल्या लढाईकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बेगुसरायमधल्या लढतीत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तनवीर कुठेच नाहीत, असं कन्हैयाकुमार यांचं म्हणणं आहे.

कन्हैयाकुमार यांना सीपीआयएम पक्षाने बेगुसरायमधून उमेदवारी दिली आहे. 'इथे मतदारांचा विजय होईल आणि सत्तेचा उन्माद असणाऱ्यांना पराभूत व्हावं लागेल. भाजपचे उमदेवार गिरीराज सिंह तर बेगुसरायमध्ये येऊही इच्छित नाही. त्यांचा थाटमाट दिल्लीतच आहे', अशा शब्दात कन्हैयाकुमार यांनी गिरीराज सिंह यांच्यावर टीका केली. जी व्यक्ती बेगुसरायलाच नाकारते तिला तिथली जनता कसं काय स्वीकारेल, असा सवालही त्यांनी विचारला.

डाव्या पक्षांना जनाधार नाही, असं महागठबंधनमधल्या नेत्यांना वाटतं पण स्थिती उलटी आहे. महागठबंधनमधल्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवारच आता शर्यतीच्या बाहेर गेले आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.

बिहारमधल्या या बेगुसराय मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा होता. 2014 च्या निवडणुकीत इथे भाजपचे नेते भोला प्रसाद सिंह यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजयही झाला होता.

आता डाव्या पक्षांनी मैदानात उतरवलेल्या कन्हैयाकुमार यांना इथे कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावं लागेल. गिरीराज सिंह कट्टर मोदी समर्थक आहेत तर कन्हैयाकुमार हे कट्टर मोदीविरोधक. त्यामुळेच बेगुसरायची लोकसभेची जागा 'हॉट सीट' बनली आहे.

Loading...

बेगुसराय मतदारसंघ हा कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. पण गेल्या काही दशकांत या पक्षांची इथली पकड ढिली झालीय. इथले भूमिहीन शेतकरी, मजूर आधी सीपीआय सोबत होते पण आता मात्र या सगळ्या मतदारांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवला आहे.

=============================================================================================================================================

'हाऊ इज द जोश' म्हणायला चिनूक हेलिकॉप्टर सज्ज, पाहा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2019 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...