मुंबई, 12 मे : देशात सहाव्य टप्प्यातील मतदान पार पडत आहे. शिवाय, निकालाची तारीख देखील जवळ येत असल्यानं सत्ता कोण स्थापन करणार? कुणाला सर्वाधिक जागा मिळणार? काँग्रेस किंवा भाजपला बहुमत न मिळाल्यास सत्ता कोण स्थापन करणार? अशा अनेक प्रश्नांवर सध्या जोरात चर्चा सुरू आहे. सट्टा बाजारात देखील त्याबद्दल आता अंदाज वर्तवले जात आहे. शिवाय, वेळ पडल्यास Kingmakerची भूमिका कोण पार पाडणार याला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे.
काय आहे सट्टा बाजाराचा अंदाज
मध्य प्रदेशातील नीमच सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजपला 247 ते 250 आणि काँग्रेसला 77 ते 79 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राजस्थानमधील फलौदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजपला 240 ते 245 जागा मिळण्याचा अंदाज असून NDAला 320 ते 325 जागा मिळतील असा अंदाज आहे. फलौदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये भाजपला 21 ते 22 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर, राज्यात सत्ता असलेल्या काँग्रेसला केवळ 3 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
'केजरीवाल, काही काम नसेल तर घरी जेवायला या!'
सुरतचा सट्टा बाजाराचा अंदाज काय?
सुरत सट्टा बाजारामध्ये देखील काही वेगळी स्थिती नाही. सुरत सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजपला 246 ते 248 जागा मिळतील. तर, काँग्रेसला 78 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, गुजरातमध्ये भाजपला 22 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2014मध्ये भाजपनं या ठिकाणी सर्वच्या सर्व म्हणजेच 26 जागा जिंकल्या होत्या ही बाब महत्त्वाची.
ही आकडेवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ती आकडेवारी न्यूज18नं वाचकांसमोर मांडली आहे. या आकडेवारीचा न्यूज18 सोबत काहाही संबंध नाही.
राष्ट्रगीताला उभा राहिला नाही म्हणून सिनेमागृहात तरूणाला जमावाची मारहाण!
कोण ठरेल किंगमेकर
भाजप किंवा काँग्रेसला बहुमत न मिळाल्यास कोणत्या पक्षांना महत्त्व येणार? Kingmakerची भूमिका कोण पार पाडणार? यावर देखील आता चर्चा सुरू झाल्या आहेत
जननमोहन रेड्डी काय निर्णय घेणार?
गरज लागल्यास जननमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार हे पाहावं लागणार आहे. काँग्रेसपासून फारकत घेत वायएसआर रेड्डी यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. आंध्र प्रदेशात YSR काँग्रेस 13 ते 20 जागा जिंकेल असा अंदाज आहे. पण, पाठिंबा कुणाला देणार याबद्दल अद्याप काहीही स्पष्टता नाही.
नवीन पटनायक कुणाला देणार पाठिंबा?
ओडिसामध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या BJDचे प्रमुख आणि ओडिसाचे मुख्यमंत्री बिजू पटनायक जागा कमी पडल्यास कुणाला पाठिंबा देतील हे पाहावं लागणार आहे. बीजेडीकडे किमान 10 ते 15 खासदार असतील असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी BJDनं काँग्रेस आणि भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी कुणाला पाठिंबा देणार याबाबत काहीही निर्णय जाहीर केलेला नाही. पण, सद्य स्थितीत पटनायक नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील असा अंदाज आहे.
हॉटेलमध्ये पत्नीचा संशयास्पद मृत्यू; हनिमूनसाठी गेलेल्या पतीला देश सोडण्यास बंदी
TRSला देखील महत्त्व
TRS देखील सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. चंद्रशेखर राव यांच्या TRSची तेलंगनामध्ये पकड मजबूत आहे. तेलंगना राष्ट्र समिती 12 ते 15 जागा जिंकेल असा अंदाज आहे.
ममता बॅनर्जी भाजपला मदत करतील?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींविरोधात सतत टीका केली आहे. यापूर्वी तृणमुल काँग्रेसनं केंद्रात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना पाठिंबा दिला आहे. तृणमुल काँग्रेस 20 ते 25 जागा जिंकेल असा अंदाज आहे. पण, यावेळी वेळ पडल्यास पाठिंब कुणाला देणार हे पाहावं लागणार आहे.
सपा - बसपा काँग्रेसला देणार?
उत्तर प्रदेशातील सपा – बसपा देखील सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. सपा – बसपाला 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दोन्ही पक्ष वेळ पडल्यास काँग्रेसला साथ देण्याची दाट शक्यता आहे.
VIDEO : काँग्रेसला किती जागा मिळणार? मतदान केल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतक्रिया