कोण होणार राजस्थानचा 'पायलट'? राहुल गांधींनी बोलावली बैठक

कोण होणार राजस्थानचा 'पायलट'? राहुल गांधींनी बोलावली बैठक

सचिन पायलट यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.

  • Share this:

13 डिसेंबर : मध्य प्रदेश पाठोपाठ आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण करायचा? यासाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक सुरू आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानच्या नेत्यांना बैठकीला बोलावलं आहे.

राजस्थानमध्ये 99 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. बहुमतासाठी बसपाने जाहीर पाठिंबा दिल्यामुळे इथंही सत्तेचा मार्ग मोकळा झाला. परंतु, मुख्यमंत्री कोण होणार यावर कोणताही निर्णय झाला नाही.

राजस्थानमध्येही अशोक गहलोत यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. परंतु, इथं सचिन पायलट नाराज झाले आहे. सचिन पायलट यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.

पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी योग्य तो निर्णय घेतील तो आपल्या सर्वांना मान्य राहिलं असं सचिन पायलट यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

त्यामुळे अंतिम निर्णय घेण्याआधी राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांना भेटण्यासाठी बोलावलं आहे. राहुल गांधी यांचं कल हा अशोक गहलोत यांच्याकडे आहे. गहलोत हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहे. त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्रीही भुषवले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक पाहता गहलोत यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे.

त्यामुळे आता अधिकृत नावाची घोषणा होते का हे पाहण्याचं ठरणार आहे.

=================

First published: December 13, 2018, 10:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading