मनोज तिवारींचा पत्ता कट, दिल्ली भाजप अध्यक्षपदासाठी शोध सुरू

मनोज तिवारींचा पत्ता कट, दिल्ली भाजप अध्यक्षपदासाठी शोध सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर आता नव्या दिल्ली भाजप प्रदेश अध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : दिल्ली निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता भारतीय जनता पार्टी नवीन प्रदेश अध्यक्षाची नियुक्ती करणार असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात भाजपने आपला नवीन दिल्ली  प्रदेश अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

दिल्ली भाजप प्रदेश अध्यक्ष पदासाठी मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष निवडीसाठी खासदार,आमदार, मोर्चा प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून नव्या प्रदेश अध्यक्षाबाबत विचारणा करण्यात आली आहे. आताच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी भाजपाला केवळ 8 जागांवर यश मिळालं होतं. त्यानंतर दिल्ली भाजप प्रमुख मनोज तिवारी यांची राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र दुसऱ्या प्रदेश अध्यक्षांची नियुक्ती होण्यापर्यंत मनोज तिवारी यांना पद सोडता येणार नाही.

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महासचिव पी. मुरलीधर राव आणि महिला विंगची प्रमुख विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये या दोघांव्यतिरिक्त इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते. या पदासाठी अनिल जैन, पवन शर्मा, आशिष सूद आणि महेश गिरी यांसारख्या वरिष्ठ नेत्यांची नावे समोर आली आहेत. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की हर्षवर्धन यांना सोडून अधिकतर खासदारांनी या पदासाठी उत्सुकता दाखवली आहे. ज्यामध्ये परवेश साहिब सिंह, गौतम गंभीर, मीनाक्षी लेखी, विजय गोयल, रमेश बिदुरी आणि तिवारी यांचा समावेश आहे. जनसत्ता या वृत्तसंस्थेत यासंदर्भातील बातमी आली आहे.

राव आणि रहाटकर हे राज्यातील नेत्यांचा सल्ला केंद्रिय नेतृत्वांपर्यंत पोहोचवतील. त्यानुसार पुढल्या आठवड्यापर्यंत कदाचित नव्या प्रदेश अध्यक्षांची घोषणा करण्यात येईल.

हे वाचा : 'किमान 15 मिनिटं ऊन घ्या व्हायरसचा नाश होईल', कोरोनाबाबत मंत्र्याचा अजब सल्ला

First published: March 19, 2020, 11:53 PM IST

ताज्या बातम्या