काँग्रेसमध्ये होऊ शकतात 2 अध्यक्ष, या नावांचा होतोय विचार

काँग्रेसमध्ये होऊ शकतात 2 अध्यक्ष, या नावांचा होतोय विचार

राहुल गांधी जरी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असले तरी प्रियांका गांधी यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठी विचार केला जाणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. सोनिया गांधीही तब्येतीच्या कारणांमुळे आता तेवढ्या सक्रिय नाहीत. त्यामुळेच नवे अध्यक्ष गांधी घराण्यातले नसतील, असा अंदाज आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जून : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. काँग्रेस कार्यकारिणीने मात्र त्यांचा राजीनामा फेटाळला. पण तरीही राहुल गांधी राजीनामा देण्याच्या मन: स्थितीत आहेत. नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत ते पदावर राहतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

राहुल गांधी जरी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असले तरी प्रियांका गांधी यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठी विचार केला जाणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. सोनिया गांधीही तब्येतीच्या कारणांमुळे आता तेवढ्या सक्रिय नाहीत. त्यामुळेच नवे अध्यक्ष गांधी घराण्यातले नसतील, असा अंदाज आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसमध्ये दोन कार्यकारी अध्यक्ष असावेत या सूचनेला पक्षाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली आहे. काँग्रेसच्या दोन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक दक्षिण भारतातला असेल तर चांगलं होईल, असा प्रस्ताव आला आहे. कार्यकारी अध्यक्ष अनुसूचित जाती-जमातींमधला असावा, असाही एक प्रस्ताव आहे.

यांची होऊ शकते निवड

नव्या अध्यक्षांसाठी सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांवर विचार सुरू आहे. त्याचबरोबर तरुण अध्यक्ष म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांचंही नाव घेतलं जात आहे. नव्या अध्यक्षांची निवड संसदेच्या बजेट अधिवेशनापूर्वी होऊ शकते, अशी माहिती आहे.

राहुल गांधी सध्या केरळमध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी गेले आहेत. त्यांनी केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवली होती. पुढचे तीन दिवस ते वायनाडमध्येच राहणार आहेत.

अध्यक्षपदावरून गोंधळ

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे अध्यक्षपदी मराठी व्यक्तीची निवड होईल, अशीही अटकळ आहे. पण आता पुन्हा एकदा राहुल गांधींकडे अध्यक्षपद येणार नाही, असं बोललं जातंय. नव्या अध्यक्षपदाबद्दल गोंधळ असल्यामुळे पक्षामध्येही बेशिस्त वाढण्याचा धोका आहे.

===============================================================================================

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 8, 2019, 2:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading