काँग्रेसचा शोध संपला, सोनियांनी या नेत्याला अध्यक्षपदासाठी केला फोन

काँग्रेसचा शोध संपला, सोनियांनी या नेत्याला अध्यक्षपदासाठी केला फोन

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांची मनधरणी करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यातच आता सोनिया गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी एका नेत्याला फोन केल्याची खबर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जुलै : लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांची मनधरणी करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यातच आता सोनिया गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी एका नेत्याला फोन केल्याची खबर आहे.

संसदेच्या अधिवेशनानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत याची औपचारिक घोषणा केली जाईल, असं बोललं जात आहे. सोनिया गांधींनी हा फोन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केला आहे, अशी माहिती आहे.

सुशीलकुमार शिंदेंची पक्षनिष्ठा

सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंनी यूपीए सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत. महाराष्ट्रामध्ये ते आणि विलासराव देशमुख यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू झाली तेव्हा पक्षाने सुशीलकुमार शिंदेंना आंध्र प्रदेशचं राज्यपाल बनवलं. पण सुशीलकुमार शिंदेंनी याबद्दल एका शब्दानेही नाराजी व्यक्त केली नव्हती.

मराठा आरक्षणाचं मुख्यमंत्र्यांनी मांडलं हे नवं विधेयक

सुशीलकुमार शिंदे हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ मानले जातात. त्यांनी पक्षादेश डावलून कधीही स्वत:च्या महत्त्वाकांक्षा पुढे रेटल्या नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे.

केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी

सुशीलकुमार शिंदे पाच वेळा आमदार झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी निभावली. 1992 मध्ये शिंदेंना राज्यसभेत पाठवण्यात आलं. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली.2002 मध्ये सुशीलकुमार शिंदेना यूपीए ने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली पण एनडीएचे उमेदवार भैरोसिंह शेखावत यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांना पाचारण करण्यात आलं.

बीफ बॅन खटला : या महिला न्यायाधीश नाही करणार सुनावणी

2009 ते 2012 या काळात ते देशाचे ऊर्जामंत्री होते. यूपीए - 2 मध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून काम केलं. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपदही सांभाळलं आहे.मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र सुशीलकुमार शिंदेना पराभव पत्करावा लागला आहे.

=========================================================================================

3 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, 26 गावांना मोठा धोका

First published: July 1, 2019, 6:59 PM IST

ताज्या बातम्या