अमित शहा यांच्यानंतर आता भाजपचा अध्यक्ष कोण? ही दोन नावं चर्चेत

अमित शहा यांच्यानंतर आता भाजपचा अध्यक्ष कोण? ही दोन नावं चर्चेत

अमित शहा यांच्यानंतर भाजपचा अध्यक्ष कोण बनणार ? या प्रश्नावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये जे. पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव यांची नावं आघाडीवर आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जून : अमित शहा यांच्यानंतर भाजपचा अध्यक्ष कोण बनणार ? या प्रश्नावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शहा यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तर हा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे.

यामध्ये जे. पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव यांची नावं आघाडीवर आहेत. भाजपचं केंद्रीय नेतृत्व या आठवड्यात यापैकी एका नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या दोघांपैकी एकाची निवड कार्यकारी अध्यक्ष म्हणून होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कार्यकारी अध्यक्षाची निवड होईल त्यालाच नंतर पक्षाचा अध्यक्ष म्हणून घोषित केलं जाईल.

अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाला जोरदार यश मिळालं. हीच परंपरा कायम ठेवणाऱ्या नेत्यांची निवड भाजपचे अध्यक्ष म्हणून होईल, अशी चर्चा आहे.

जे. पी. नड्डा यांचं नाव आघाडीवर

भाजपचे हे 59 वर्षांचे नेते आणि राज्यसभेचे खासदार जे. पी. नड्डा पक्षाची रणनीती ठरवणारे महत्त्वाचे नेते आहेत. ते भाजपच्या संसदीय मंडळाचे सचिव आहेत. या लोकसभा निवडणुकीत जे. पी. नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने इथे जोरदार यश मिळवलं. उत्तर प्रदेशच्या 80 जागांपैकी भाजपला इथे 62 जागा मिळाल्या.

जे. पी. नड्डा यांचा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश केला गेलेला नाही. त्यामुळेच त्यांच्या खांद्यावर भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल, अशी शक्यता आहे.

अमित शहा यांचा विश्वास

जे. पी. नड्डा हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विश्वासातले मानले जातात. अगदी कठीण प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवण्यात त्यांची ख्याती आहे. जे. पी. नड्डा हे मोदी आणि अमित शहा यांच्यासोबतच भाजपच्या शक्तिशाली त्रिमूर्तींमध्ये एक आहेत.

कोण आहेत भूपेंद्र यादव ?

भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव हेही अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. या निवडणुकीत त्यांनी बिहार आणि गुजरातचे प्रभारी म्हणून चांगली कामगिरी केली होती. जे. पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव या दोघांपैकी आता कुणाची निवड अध्यक्षपदी करायची याचा निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहांवरच अवलंबून आहे.

=======================================================================================

बेडवर चढून डॉक्टरानेच रुग्णाला धु-धुतले, VIDEO व्हायरल

First published: June 3, 2019, 8:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading