भाजपच्या मुख्यालयात बूट फेकून मारणारा तो आहे तरी कोण?

भाजपच्या मुख्यालयात बूट फेकून मारणारा तो आहे तरी कोण?

भाजपच्या दिल्लीमधल्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरू असताना एका व्यक्तीने खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर बूट फेकून मारला. भाजपचे नेते प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिल्याबदद्ल पत्रकार परिषद घेत होते. त्याच वेळी ही बूट फेकून मारण्याची घटना घडली.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 एप्रिल : भाजपच्या दिल्लीमधल्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरू असताना एका व्यक्तीने खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर बूट फेकून मारला. भाजपचे नेते प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिल्याबदद्ल पत्रकार परिषद घेत होते. त्याच वेळी ही बूट फेकून मारण्याची घटना घडली.

हॉस्पिटलचा मालक

भाजपच्या पत्रकार परिषदेत बूट फेकून मारणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे शक्ती भार्गव. तो उत्तर प्रदेशमधल्या कानपूरचा आहे. बूट फेकण्याच्या घटनेनंतर लगेचच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

शक्ती भार्गव हा भार्गव हॉस्पिटलचा मालक आहे. त्याने 2018 मध्ये तीन बंगले विकत घेतले होते. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने त्याच्यावर छापा घातला होता. या 3 बंगल्यांचा खरेदी व्यवहार 11 कोटी 50 लाख रुपयांचा होता. यासाठीचे पैसे शक्तीसिंह भार्गव याच्याच खात्यातून दिले गेले. पण त्याची पत्नी आणि मुलांच्या नावावर त्याने ते खेरदी केले होते.

व्हिसल ब्लोअर असल्याचा दावा

शक्ती भार्गव याने आपल्या फेसबुक अकाउंटवर तो व्हिसल ब्लोअर आहे,असं म्हटलं आहे. काही दिवसांपासून तो भाजपच्या कार्यालयात येत होता, अशीही माहिती पुढे आली आहे. कानपूरमधल्या गिरण्या बंद पडल्याच्या विरोधात त्याने आवाज उठवला होता.

पैसै आले कुठून ?

बंगल्यांच्या खरेदी व्यवहारात शक्ती भार्गव याच्यावर बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा आरोप झाला होता. त्याप्रकरणी त्याचा तपासही झाला. या बंगल्यांच्या खरेदीतले पैसे कुठून आले हे तो सांगू शकला नव्हता. प्राप्तिकर विभागाने डॉ. शक्ती भार्गवच्या घरून 28 लाख आणि 50 लाख रुपयांचे दागिने जप्त केले होते.

शक्ती भार्गव याची आई दया भार्गव यांनी आपलं मुलाशी आता काही नातं नाही, असं म्हटलं आहे. आपल्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असं त्यांनी सांगितलं. शक्ती भार्गव आम्हाला त्रास द्यायचा म्हणून आम्ही त्याच्यापासून वेगळे राहतो, असंही दया भार्गव म्हणाल्या.

===========================================================================================================================================================

VIDEO : भाजपमधील 'चप्पल कांड'नंतर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2019 05:54 PM IST

ताज्या बातम्या