मराठी बातम्या /बातम्या /देश /Omicron हा कोरोना महामारीचा शेवट आहे का? जाणून घ्या, काय म्हणाले WHO चे प्रमुख

Omicron हा कोरोना महामारीचा शेवट आहे का? जाणून घ्या, काय म्हणाले WHO चे प्रमुख

corona

corona

ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे. दरम्यानच्या काळात ओमिक्रॉननंतर कोरोना महामारीचा शेवट होईल, अशा चर्चांचं पेव फुटलं होतं. यावर आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओनं (WHO) भाष्य केलं आहे.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 25 जानेवारी: जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pendamic) संकट पुन्हा गडद झालं आहे. कोरोना व्हायरसच्या 'ओमिक्रॉन' (Omicron) या नवीन व्हेरियंटची दहशत सर्वत्र पसरली आहे. ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येत आहे. युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दक्षिण आफ्रिकेपासून सुरू झालेला ओमिक्रॉनचा प्रसार भारतातदेखील झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंत लाखो रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. यापैकी दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे.

  ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे. दरम्यानच्या काळात ओमिक्रॉननंतर कोरोना महामारीचा शेवट होईल, अशा चर्चांचं पेव फुटलं होतं. यावर आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओनं (WHO) भाष्य केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणं, ओमिक्रॉन हा कोरोना महामारीचा शेवट नाही. कोरोना व्हायरस पुन्हा आपलं रुप बदलू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. लसीकरणासाठी (Vaccination) संपूर्ण जगानं अधिक गंभीरपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकांचं लसीकरण करण्यावर भर देण्यासोबतच मास्क वापरण्यास सक्ती करण्याचीही गरज आहे.

  कधी होणार कोरोना महामारीचा शेवट? शास्त्रज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

  डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अॅडानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटलं आहे की, ओमिक्रॉननंतरही कोरोनाचे नवीन व्हेरियंट निर्माण होऊ शकतात. म्हणजेच ओमिक्रॉनचा शेवट हा काही कोरोना महामारीचा अंत नाही. कदाचित पुढे चालून कोरोनाचं स्वरूप आणखी बदलू शकतं. यामुळे एक नवीन व्हेरियंट समोर येईल आणि पुन्हा एकदा जगाला कठीण काळाला सामोरं जावं लागू शकतं. सध्या जगभरात कोरोना रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे. जगभरात दररोज कोरोनाचे सुमारे 23 लाख रुग्ण आढळत आहेत. एकट्या भारतात कोरोना संसर्गाची दररोज सुमारे तीन लाख प्रकरणं नोंदवली जात आहेत. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच डब्ल्यूएचओनं सावधानतेचा इशारा दिला आहे.

  डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी असंही म्हटलं आहे की, कोरोनाची तिसरी लाट या वर्षी (2022) संपुष्टात येऊ शकते. परंतु, त्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन चांगली रणनीती बनवण्याची गरज आहे. जगातील किमान 70 टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण (दोन्ही डोस आणि बुस्टर डोस) करावं लागेल. हा आकडा सध्या 50 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे येत्या काळात लसीकरणावर विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

  कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) सध्या सर्वात धोकादायक स्थितीमध्ये आहे. केवळ नऊ आठवड्यांमध्ये, ओमिक्रॉननं कहर केला आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनची सुमारे 8 कोटी प्रकरणं नोंदवली गेली आहेत. ही रुग्णसंख्या 2020 मध्ये नोंदवलेल्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे. गेल्या 24 तासांत जगभरात 23 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यावरून परिस्थिती नियंत्रणात नसल्याचं सिद्ध होतं. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ प्रमुखांनी तातडीनं एक कार्यकारी बैठक (Executive meeting) घेतली. या 150व्या कार्यकारी बैठकीत सांगितल्याप्रमाणं, गेल्या आठवड्यात दर तीन सेकंदाला कोरोना संसर्गाची 100 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर, दर 12 सेकंदाला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झालेला आहे.

  First published:

  Tags: Corona, Omicron, Who