गोविंदा स्टाइल डान्स करणारे हे काका आहेत तरी कोण?

गोविंदा स्टाइल डान्स करणारे हे काका आहेत तरी कोण?

सध्या सोशल मीडियावर गोविंदा स्टाइल डान्स करणारे काका व्हायरल झालेत. पण हे काका नक्की कोण आहेत हे न्यूज18लोकमतनं शोधून काढलंय.

  • Share this:

01 जून : सध्या सोशल मीडियावर एका लग्नात गोविंदा स्टाइल डान्स करणारे काका व्हायरल झालेत. पण हे काका नक्की कोण आहेत हे न्यूज18लोकमतनं शोधून काढलंय. हे आहेत संजीव श्रीवास्तव. भाभा इंजिनीयरिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर आहेत. नागपूरच्या प्रियदर्शनी इंजिनीयरिंग काॅलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलंय.आता ते भोपाळमध्ये राहतात.

संजीव श्रीवास्तव म्हणाले, त्यांनी मिथुन चक्रवर्तीपासून डान्सची प्रेरणा घेतलीय. हा डान्स त्यांनी 12 मे रोजी आपल्या मेव्हण्याच्या लग्नात केला होता. तो इतका व्हायरल होईल असं वाटलं नव्हतं.

कदाचित त्यांच्या एका विद्यार्थ्यानं हा व्हिडिओ व्हायरल केला असावा. फेसबुकवर या व्हिडिओला खूप लाइक्स मिळाल्यात. आपके आ जाने से या गाण्यावर या काकांनी फूल्ल टू धमाल डान्स केलाय. त्यांचा डान्स पाहून काकांना प्रॅक्टिस असावी असं वाटतंय.

काकांसोबत उभ्या असलेल्या काकूंनी थोडी फार साथ दिलीय. पण काका एकदम छा गये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 12:40 PM IST

ताज्या बातम्या