Home /News /national /

IPL 2020चा विजेता की बिहारचा ‘बिग बॉस’, कुणाचा निकाल लागणार पहिले?

IPL 2020चा विजेता की बिहारचा ‘बिग बॉस’, कुणाचा निकाल लागणार पहिले?

उत्सुकता आणि रोमांच असला तरी क्रिकेटचा निकाल ठरलेल्या वेळातच लागेल तो जास्त ताणला जाणार नाही. मात्र मतमोजणीत उत्सुकता, रोमांच आणि वेळ या तिनही गोष्टींची कसोटी लागणार आहे.

    पाटणा 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभेची मतमोजणी (Bihar Election result) आणि IPL 2020चा फायन रणसंग्राम हा एकाच दिवशी असल्याने मंगळवार 10 नोव्हेंबरचा दिवस हा क्रिकेट आणि राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. बिहारचा बिग बॉस आणि IPLचा बादशहा कोण होणार हे आज कळणार आहे. संध्याकाळ पर्यंत बिहारची स्थिती स्पष्ट होईल तर रात्री मुंबई इंडियन्स की दिल्ली डेअरडेव्हिल्स कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. उत्सुकता आणि रोमांच असला तरी क्रिकेटचा निकाल ठरलेल्या वेळातच लागेल तो जास्त ताणला जाणार नाही. मात्र मतमोजणीत उत्सुकता, रोमांच आणि वेळ या तिनही गोष्टींची कसोटी लागणार आहे.निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सर्व निकाल येण्यास रात्री उशीर होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. बिहार विधानसभेच्या मतमोजणीत दुपारपर्यंत 15 निकाल लागले होते. त्यात NDAला 12 तर महाआघाडीला 3 जागांवर विजय मिळाला आहे. बिहारमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 25 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. अजूनही 4 कोटी मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे निकाल फिरण्याचीही शक्यता आहे. Bihar: ‘अमेरिकेत EVM मशीन्स असती तर ट्रम्प हरले असते का?’ काँग्रेसची शंका दुपारी 1 वाजेपर्यंत NDA ला 128 जागांवर आघाडी मिळालेली होती, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनला 100 च्या आसपास जागांवर आघाडी मिळवता आली. पण जवळपास 100 जागांवर दोन उमेदवारांच्या मतांमध्ये 2000 पेक्षाही कमी तफावत आहे. त्यामुळे निवडणूक निकालाचा कल कधीही फिरण्याची शक्यता आहे. दुसरं कारण अद्याप मतमोजणी अंतिम टप्प्यात आलेली नाही. निकाल पूर्ण व्हायला विलंब होऊ शकतो आणि पुढच्या टप्प्यांमध्ये कदाचित कल बदलूही शकतात. Bihar Election : बिहार निवडणुकीचा विजयी निकाल हाती, एनडीएने जिंकल्या 3 जागा या वेळी कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि कमी गर्दी व्हावी यासाठी अधिक EVM मशीन लावण्यात आली होती. त्यामुळे मतमोजणीला वेळ लागू शकतो. नेहमी 20-25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होते. या वेळी मशीन्स वाढल्यामुळे किमान 35 फेऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीचा अंतिम निकाल लागण्यासाठी रात्र होऊ शकते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालची राजद-काँग्रेस आघाडी या दोन्हीमध्ये चुरशीची लढाई होत आहे. त्यामुळे निकाल सरळ साधा नाही. बिहारमध्ये आत्तापर्यंत 1 कोटी 31 लाख मतांची मोजणी झालीय तर अजुनही 2 कोटी 79 लाख मतांची मोजणी बाकी आहे. मतांची आघाडीही 1 ते 2 हजारांपर्यंतच असल्याने सगळ्याच पक्षांना अंदाज बांधणे कठिण जात आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Bihar Election

    पुढील बातम्या