कोण आहे विनायक? कसा पोहोचला भय्यू महाराजापर्यंत?

कोण आहे विनायक? कसा पोहोचला भय्यू महाराजापर्यंत?

भय्यूजी महाराजांच्या सगळ्यात जवळ असणारा विनायक हा मुळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जून  : आध्यात्मिक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेलं मोठं प्रस्थ असलेल्या भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला बरोबर वर्ष झालं. 12 जून 2018 रोजी त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने खळबळ उडाली होती. त्यानंतर काही महिन्यांनी या आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली. भय्यू महाराज यांचा विश्वासू सेवादार विनायक दुधाडेला पोलिसांनी अखेर अटक केली. त्याच्यासोबत आणखी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

विनायक हा भय्यू महाराज यांचा अत्यंत विश्वासू सेवादार होता. भय्यूजी महाराज त्याला आपल्या घरातील सदस्यपेक्षा जास्त मानत होते.

त्यामुळेच भय्यूजींनी आपली संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता विनायककडे दिले होते. आत्महत्येच्या वेळी भय्यूजींनी अशी सुसाईट नोटच लिहून ठेवली होती.

"विनायक माझ्या विश्वासार्ह आहे. विनायक माझ्या वित्त, मालमत्ता आणि बँक खात्याची सर्व जबाबदारी घेईल. हे कोणत्याही दबावाखाली लिहिलेले नाही." असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आलं होतं.

भय्यूजी महाराजांच्या सगळ्यात जवळ असणारा विनायक हा मुळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोन दशकांपूर्वी विनायक इंदूरहून महाराष्ट्रात आला होता. काही दिवस इंदूरमध्ये राहिल्यानंतर तिथल्या स्थानिकांच्या मदतीने तो भय्यूजींच्यासंपर्कात आला. काही दिवसांतच त्याने भय्यूजींचा विश्वास जिंकला होता.

खरंतर, विनायक याच्या आधी एका दुसऱ्या व्यक्तीनं त्यांची सेवा केली. पण, विवाह झाल्यानंतर त्यांनी महाराजांपासून लांब राहणं पसंत केलं आणि नंतर भय्यूजी महाराजांनी सर्व जबाबदाऱ्या विनायक यांच्याकडे सोपवल्या होत्या.

भय्यूजी यांच्या आयुष्याशी संबंधित सगळ्या गोष्टी विनायकला माहीत असायच्या. त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्याचा हस्तक्षेप असायचा. इतकंच काय तर भय्यूजींच्या पहिल्या पत्नीच्या निधनांतर त्यांच्या मुलीची जबाबदारीही त्याने उचलली होती.

ज्या वेळी भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळ्या घालून आत्महत्या केली, तेव्हीही विनायक घरीच होता.

======================================

SPECIAL REPORT : मैदानात उतरण्याआधीच पाकची रडारड सुरू, जाहिरातीतून घेतला 'पंगा'!

First published: December 28, 2018, 11:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading