मराठी बातम्या /बातम्या /देश /

दसरा संपला आता चिन्ह विसरा, धनुष्यबाण कुणाचं? निवडणूक आयोगातून मोठी बातमी

दसरा संपला आता चिन्ह विसरा, धनुष्यबाण कुणाचं? निवडणूक आयोगातून मोठी बातमी

फाईल फोटो

फाईल फोटो

शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कोणाला मिळणार? या संदर्भात उद्या शुक्रवारी 7 सप्टेंबरला निवडणूक आयोगात

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांवर जोरदार तोफ डागली. पण, आता शिवसेनेचे पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आता उद्या 7 सप्टेंबर रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे.

शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कोणाला मिळणार?  या संदर्भात उद्या शुक्रवारी 7 सप्टेंबरला निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कागदपत्रं सादर करणार आहे. एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य सोबत असल्याचं सांगत आहे.

(एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नाना पटोलेंनी उडवली खिल्ली, म्हणाले ही स्क्रिप्ट तर...)

शिंदे गटाने विधिमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्यासोबत असल्याचं सांगत आहे आपल्याला शिवसेनेचं निवडणूक चिन्हं मिळावं असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता.

निवडणूक आयोगाने आयोगाच्या नियमाप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली होती. एकनाथ शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली.

('शिमग्यावर बोलणार नाही', फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक)

एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला कागदपत्रांच्या प्रतिलीपी द्याव्यात असे आदेश दिले. शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. अजूनही दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूकक जाहीर झाली आहे, त्यामुळे अशा स्थितीत आयोगाला काय निर्णय घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे. शिवसेनेनंही मुदतवाढ मागितली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published:

Tags: Marathi news