निर्भयाला न्याय देण्यासाठी ढाल बनून उभ्या असलेल्या सीमा समृद्धी कोण आहेत?

निर्भयाला न्याय देण्यासाठी ढाल बनून उभ्या असलेल्या सीमा समृद्धी कोण आहेत?

निर्भयाला न्याय मिळवून देण्यामध्ये सीमा समृद्धी यांचा वाटा मोठा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च :निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज नराधमांना अखेर तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. 7 वर्ष 3 महिन्यांचा हा न्यायासाठीचा संघर्ष सोपा नक्कीच नव्हता. नराधमांकडून फाशी रद्द करण्यासाठी अनेक योजना अनेक डावपेच खेळून झाले होते. मात्र न्यायव्यवस्थेनं कुठल्याही गुन्ह्याला पाठिंबा न देता न्याय दिल्याचा आनंद आज निर्भयाच्या आईच्या चेहऱ्यावर होता. या 7 वर्षांच्या लढाईमध्ये निर्भयाच्या आई-वडिलांसोबत ढाल म्हणून उभ्या होत्या त्या म्हणजे सीमा समृद्धी. ही लढाई लढणं नक्कीच सोप नव्हतं. मानसिकरित्या खचून जाणं जमणारं नव्हतं. त्यामुळे निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या कुटुंबियांच्या बरोबर त्या खंबीरपणे आणि धैर्यानं उभ्या राहिल्या होत्या.

नराधमांना फाशी दिल्यानंतर सीमा समृद्धी यांच्या काय होती प्रतिक्रिया

'निर्भयाच्या नराधमांना फाशी तर झाली. उशिरा पण योग्य न्याय मिळाला.अजूनही या देशात हजारो मुली राहत आहेत ज्या न्यायाकडे डोळे लावून बसल्या आहेत. मी त्यांच्यासाठी जीवात जीव असेपर्यंत लढत राहीन. निर्भायाच्या न्यायासाठी आतापर्यंतचा लढा नक्कीच सोपा नव्हता. विरोधकांनी अनेक पळवाटा शोधल्या. अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा खटाटोप न्यायालयाच्या लक्षात आला. न्यायालयानं सत्याच्या बाजूनं निकाल दिला आणि नराधमांना फाशी दिली.'

आता नवऱ्याला कधीच नाही सांगू शकणार ही गोष्ट, दोषी अक्षयच्या पत्नीची इच्छा अपूर्ण

कोण आहेत या सीमा समृद्धी ज्यांचा या न्यायाच्या लढाईत मोलाचा वाटा होता

मूळ्च्या उत्तर प्रदेशाती असलेल्या सीमा समृद्धी सुप्रीम कोर्टाच्या वकील आणि निर्भया ज्योती ट्रस्टमध्ये कायदेशीर सल्लागार आहेत.

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर 2014 साली त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली पेशाला सुरुवाात केली.

24 जानेवारी 2014 रोजी ती निर्भया ज्योती ट्रस्टमध्ये रुजू झाल्या.

हे प्रकरण जेव्हा त्यांच्याकडे आलं तेव्हा त्या निर्भयाच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. निर्भयाला न्याय मिळवून देण्यामध्ये सीमा समृद्धी यांचा वाटा मोठा आहे. निर्भयाच्या नराधमांना फाशी झाल्यानंतर तिच्या आईनं निर्भयाचा फोटो उराशी कवटाळून न्याय मिळाल्याचा आनंद साजरा केला. त्याच बरोबर मुलीला वाचवू शकलो नाही याचं दु:खही व्यक्त केलं. मात्र असे गुन्हे करणाऱ्यांना आता कायदा बदलून तातडीनं शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही आशादेवी यांनी केली आहे.

फाशीच्या खोलीत जल्लाद पवनला काहीतरी बोलायचं होतं, पण तरी राहिला गप्प

First published: March 20, 2020, 4:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या