दिग्विजयसिंहांना आव्हान देणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह आहेत कोण?

दिग्विजयसिंहांना आव्हान देणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह आहेत कोण?

भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी होत्या पण 9 वर्षं तुरुंगात काढल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

  • Share this:

भोपाळ, 18 एप्रिल : भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नेहमीच हिंदू दहशतवादावरून भाजपला लक्ष्य केलं आहे.आता ते विरुद्ध साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अशी लढत असल्याने इथला प्रचार स्फोटक होण्याची चिन्हं आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोट

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी होत्या पण 9 वर्षं तुरुंगात काढल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी एकेक विधानं करायला सुरुवात केली होती. तुरुंगात आपला सलग 23 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला होता. आपल्याला जाणुनबुजून या दहशतवादी कटात गोवण्यात आलं, असाही दावा त्यांनी केला. त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी हिंदू दहशतवाद नावाचा एक खोटा शब्द आणला आणि हे सिद्ध करण्यासाठीच आपल्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले, असंही त्यांचं म्हणणं होतं.

स्फोटक वक्तव्यं

साध्वी प्रज्ञासिंह त्यांच्या स्फोटक आणि वादग्रस्त विधानांबद्दल प्रसिद्ध आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदसोबतच त्या विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनी या संघटनेशीही जोडलेल्या होत्या.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच जणांवर बेकायदेशीर कृत्यं केल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोका (MCOCA)नुसारही आरोप होते पण नंतर कोर्टाने त्यांची त्यातून मुक्तता केली. हिंदू दहशतवादाशी संबंधित स्वामी असीमानंद हे तिसंर नाव. त्यांचीही समझौता एक्सप्रेस स्फोट प्रकरणी मुक्तता झाली.

सुनील जोशी हत्याकांड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्याकांडामध्येही प्रज्ञासिंग या आरोपी होत्या पण कोर्टाने त्यांना याही आरोपातून मुक्त केलं. साध्वी प्रज्ञा सिंह यांचा जन्म मध्य प्रदेशमधल्या भिंड जिल्ह्यात कछवाहा मध्ये झाला. इतिहासामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रज्ञा सिंह या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय सदस्य राहिल्या आहेत.

भाषणांमुळे प्रभाव

मध्य प्रदेशमध्ये भोपाळ, देवास, इंदूर, जबलपूर या ठिकाणी आधी त्यांची भाषणं व्हायची. त्यानंतर त्यांनी अचानक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोडली आणि त्या साध्वी बनल्या. गावागावांत जाऊन त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार सुरू केला. त्यांनी सुरतमध्येही काम सुरू केलं आणि तिथे एक आश्रम उघडला. हिंदुत्वाच्या प्रचारामुळे त्या भाजपच्या नेत्यांना प्रभावित करायच्या. त्यामुळे राजकारणातलं त्यांचं वर्चस्व वाढत गेलं.

आता तर दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध उमेदवारी मिळाल्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांचं पक्षातलं वजन वाढलं आहे.

=================================================================================================================================================================

निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी असं वापरलं जातीचं कार्ड पाहा UNCUT भाषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2019 05:24 PM IST

ताज्या बातम्या