मराठी बातम्या /बातम्या /देश /

Life@25 : वयाच्या 23व्या वर्षी Oyo Roomsची चेन तयार करणाऱ्या रितेश अग्रवालची सॉलिड कहाणी

Life@25 : वयाच्या 23व्या वर्षी Oyo Roomsची चेन तयार करणाऱ्या रितेश अग्रवालची सॉलिड कहाणी

ओयो

ओयो

ओयो रूम्स ही हॉटेल चेन आज खूप प्रसिद्ध आहे. त्याचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या रितेश अग्रवाल वयाच्या 23-24व्या वर्षीच अब्जाधीश बनले.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 डिसेंबर :   आपल्याला सुचलेल्या कल्पनेवर समर्पण भावनेने काम केल्यास आणि कितीही संकटं आली तरी प्रामाणिकपणाने कष्ट करणं न सोडल्यास यशप्राप्ती ही अवघड गोष्ट नाही. याची अनेक उदाहरणं आपल्याला समाजात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे रितेश अग्रवाल. ओयो रूम्स ही हॉटेल चेन आज खूप प्रसिद्ध आहे. त्याचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या रितेश अग्रवाल वयाच्या 23-24व्या वर्षीच अब्जाधीश बनले. त्यांनी हे यश कसं प्राप्त केलं हे जाणून घेणं खूपच प्रेरक आहे.

1993 साली ओडिशा राज्यात कटकमध्ये बिसम इथं एका सर्वसामान्य मारवाडी कुटुंबात रितेश अग्रवाल यांचा जन्म झाला. रितेशने चांगला अभ्यास करून मोठी नोकरी मिळवावी, असं त्याच्या कुटुंबीयांना वाटत होतं; मात्र रितेशला त्याचं स्वतःचंच काही तरी सुरू करायचं होतं. 13 वर्षांचा असताना त्याने सिमकार्ड्स विकण्याचं कामही केलं होतं.

2013 साली त्याला एक प्रतिष्ठित थीम फेलोशिप मिळाली होती. त्यातून त्याला एक लाख डॉलर्स मिळाले. पुढे आपल्या वयाच्या 17 वर्षी रितेशने ओरावेल स्टेज नावाचं एक पोर्टल सुरू केलं. कमी किमतीतल्या हॉटेल्सच्या बुकिंगसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं होतं. त्यातूनच रितेशच्या पुढच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याला स्वतःला फिरण्याची खूप आवड होती. हे पोर्टल सुरू करण्याआधीच तो देशभर खूप फिरला होता. त्या अनुभवातूनच त्याने हे पोर्टल सुरू केलं आणि पुढे ओयोसारखी मोठी कंपनी सुरू केली.

हेही वाचा -  2 कोटींचा विम्याचा दावा मिळावा म्हणून पत्नी अन् मेव्हण्याची हत्या, म्हणे हा अपघात...

बिझनेसची आवड असल्याने रितेशने कॉलेज शिक्षण अर्धवटच सोडलं होतं. नंतर दिल्लीतल्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस अँड फायनान्स या संस्थेतून त्याने शिक्षण पूर्ण केलं.

रितेश यांची ओयो कंपनी 2018 साली युनिकॉर्न कंपनी बनली. हुरुन रिच लिस्ट 2020मध्ये रितेश यांचा समावेश झाला होता. तेव्हा त्यांची नेट वर्थ 110 कोटी डॉलर्स म्हणजेच तब्बल 8 हजार कोटी रुपये एवढी होती. ओयो ही आज देशातली सर्वांत मोठी हॉटेल चेन आहे.

या प्रवासातून ते काय शिकले, ते युवकांना काय सांगू इच्छितात, याबद्दल जाणून घेऊ या.

'ओयो'च्या माध्यमातून रितेश यांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रॉपर्टीचे मालक आणि ग्राहक यांना एका मंचावर आणलं. त्यामुळे जास्तीत जास्त जणांना ही माहिती मिळू लागली, पारदर्शकता वाढली, तसंच समस्या सोडवणं सोपं होऊ लागलं. आधी सॉफ्टवेअर, मग अ‍ॅप आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या साह्याने त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म अधिकाधिक उत्तम केला. ते म्हणतात, 'काही तरी नवं करत राहा. अपयशाला घाबरू नका. प्रयत्न न करणं आणि हार स्वीकारणं याच गोष्टींना घाबरा.'

हेही वाचा -  Leggings घातली म्हणून शिक्षिकेसोबत गैरवर्तन, मुख्याध्यापिकेने दिलं धक्कादायक कारण

अलीकडेच एका ट्विटमध्ये रितेश यांनी युवा उद्योजकांना उद्देशून म्हटलं होतं, 'वर्तमानात जगा. जे समोर नाहीये, ते सोडून द्या आणि जे तुम्हाला आवडतं, ते काम करा.'

रितेश यांनी शिक्षण सुरू असताना हॉटेल बुकिंगसाठी एक वेबसाइट तयार केली होती. त्यासाठी ते बराच प्रवास करायचे. अनेक बजेट हॉटेलमध्ये त्यांना सुविधा खूप वाईट असल्याचं आढळलं. त्यावर मार्ग काढण्याच्या विचारातून त्यांना ओयो रूम्सची कल्पना सुचली. ते म्हणतात, 'वैयक्तिक समस्या सोडवण्याच्या माध्यमातूनच मोठ्या कंपन्या उभ्या राहतात. योग्य कल्पना सुचणं महत्त्वाचं असतंच; पण नेमकी समस्या ओळखून त्यावर नेमकं उत्तर शोधणं अधिक महत्त्वाचं असतं.'

2012 साली रितेश यांनी ओरावेल स्टेस नावाचं एका सॉफ्टवेअरवर आधारित बजेट हॉटेल पोर्टल विकसित केलं, तेव्हा ते व्यापक करण्यासाठी त्यांनी या इंडस्ट्रीतल्या व्यक्तींशी संवाद साधला. त्याचं फळ त्यांना ओयो रूम्सच्या स्थापनेनंतर मिळालं. जुने संपर्क त्या वेळी कामी आले. हॉटेल मालकांना आपल्या कल्पनेशी जोडून घेण्यासाठी त्यांनी बरीच चर्चा केली. उद्योगासाठी धैर्य आवश्यक असतं, असं रितेश म्हणतात. तसंच, आपल्याला माणसं जोडलेली असणं महत्त्वाचं असतं, असंही ते म्हणतात. 'यशासाठी माणसं महत्त्वाची आहेत. माणसांवर विश्वास ठेवा. माणसांमध्ये गुंतवणूक करा. आपल्या मर्यादा जाणून घेण्यास मदत होईल अशा व्यक्तींमध्ये स्वतःला सामावून घ्या. ज्या व्यक्ती तुम्हाला वेळ देतात, त्या महत्त्वाच्या असतात,' असं रितेश म्हणतात.

बिझनेस वाढवायचा होता, तेव्हा रितेश यांच्या कल्पनेला गुंतवणूकदारांनी अनेकदा नाकारलं. परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. एखाद्या उद्योजकाला अनेकदा नाकारलं जाऊ शकतं. त्याची सवयच लावून घेतली पाहिजे, असं ते म्हणतात. 'अपयशाला काय घाबरायचं? तरुण उद्योजकांनी आव्हानांचा सामना करणं शिकायला हवं. कारण नाकारलं जाण्याच्या भीतीने मागे आलात, तर शिखरापर्यंत पोहोचणार कसं,' अशा शब्दांत ते प्रयत्नांचं आणि मागे न हटण्याचं महत्त्व वर्णन करतात.

यापासून प्रत्येकाने धडा घ्यायलाच हवा.

First published:

Tags: Success story