कोण आहेत रामनाथ कोविंद?

एनडीएचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार राम नाथ कोविंद, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नावाची घोषणा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2017 02:40 PM IST

कोण आहेत रामनाथ कोविंद?

19 जून : गेल्या काही दिवसांपासून एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल यावर अनेक अंदाज बांधले जात होते. आज अखेर याची उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केली. आता भाजपकडून याविषयी सगळ्या घटक पक्षांशी चर्चा केली जाणार आहे.

रामनाथ कोविंद यांचा परिचय :

- रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील परौंख गावात झाला

- कोविंद मागसवर्गीय घरातून आलेतं

- वकिली शिक्षण पूर्ण करून दिल्ली उच्च न्यायलयात वकिली केली

Loading...

- 1977 ते 1979 पर्यंत दिल्ली उच्च न्यायलयात केंद्र सरकारच्या बाजूनं वकिली केली

- 8 ऑगस्ट 2015 ला बिहारचे राज्यपाल

- 1991 मध्ये भाजपत दाखल झाले

- 1994 साली उत्तर प्रदेशातून राज्य सभेसाठी खासदार म्हणून गेले

- 2000 साली देखील राज्य सभेसाठी खासदार म्हणून गेले

- गेली 12 वर्षे राज्यसभेसाठी खासदार

- भाजपसाठी राष्ट्रीय प्रवक्ता पद पण भुषवले

रामनाथ कोविंद यांची राजकीय कारकीर्द :

- 1991 साली भारतीय जनता पार्टीत सहभाग

- 1994 साली उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवड

- 2000 साली पुन्हा उत्तरप्रदेशातून राज्यसभेचे खासदार

- 12 वर्षे राज्य सभेचे सदस्य

- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2017 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...