Home /News /national /

राजीव गांधी हत्येतील ज्या दोषीची सुटका झाली, त्याने तुरुंगात अभ्यास करून मिळवलं सुवर्णपदक

राजीव गांधी हत्येतील ज्या दोषीची सुटका झाली, त्याने तुरुंगात अभ्यास करून मिळवलं सुवर्णपदक

राजीव गांधी हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या पेरारिवलन याची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली आहे. गेल्या 31 वर्षांपासून तो तुरुंगात आहे. तामिळनाडूतील श्रीपेरुंबदुर येथे एका जाहीर सभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्याला अटक करण्यात आली तेव्हा तो अवघ्या 19 वर्षांचा होता.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 18 मे : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या (Former PM Rajiv Gandhi) प्रकरणातील दोषींपैकी एक एजी पेरारिवलन (A G Perarivalan), जो 31 वर्षांपासून तुरुंगात आहे, आता तुरुंगातून बाहेर येणार आहे. हत्येच्या कटाची कल्पना नसल्याबद्दल तो सातत्याने आपली कायदेशीर लढाई लढत होता. आता सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court of India) त्याला दिलासा मिळाला आहे. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांपैकी एक एजी पेरारिवलन याला फक्त 19 वर्षाचा असताना अटक करण्यात आली होती. 11 जून 1991 रोजी त्यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत त्यांचा हात असल्याचा आरोप होता. नंतर न्यायालयानेही त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा दिली. पेरुंबदुरच्या ज्या जाहीर सभेत राजीव गांधी यांची हत्या झाली, त्यात ज्या बॅटरी वापर करण्यात आला होता, त्याची व्यवस्था पेरारिवलन याने केली होती. तो अभियांत्रिकीचा हुशार विद्यार्थी होता. अटकेनंतर त्याने तुरुंगात शिक्षण घेतले. यामध्ये त्याला एका परीक्षेत सुवर्णपदक मिळालं आहे. पेरारिवलन यावेळी 50 वर्षांचा होणार आहे. कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर, आपण निर्दोष आहोत, राजीव गांधींच्या हत्येबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही, असं सांगत तो कायदेशीर लढाई लढला. त्याला फक्त एका बॅटरीची व्यवस्था करण्यास सांगितले होते. त्याने फक्त तेच केले. सामान्य पार्श्वभूमी पेरारिवलन यांना लोक अरिवू म्हणूनही ओळखतात. तामिळनाडूमध्ये त्याचे नाव आता घरोघरी ओळखले जाते. खरं तर, त्याच्या निर्दोषतेसाठी त्याच्या पालकांनी दीर्घ न्यायालयीन लढाई लढली. राजीव गांधींच्या सर्व मारेकऱ्यांना आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, जी नंतर जन्मठेपेत बदलली. अरिवूचे वडील एका शाळेत शिक्षक होते. तो जोलारपेठ या छोट्याशा शहरातील रहिवासी होता. सीबीआयने त्याला अटक केल्यावर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.

  Rajiv Gandhi Assassination Case : राजीव गांधी हत्येतील दोषी पेरारिवलनची तुरुंगातून होणार सुटका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

  तुरुंगातच एमसीए केले तुरुंगात आल्यानंतर त्याने 12वीची परीक्षा दिली, ज्यामध्ये तो 91.33 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला. आतापर्यंत तुरुंगात ज्या लोकांनी ही परीक्षा दिली त्यात तो टॉपर आहे. यानंतर त्याने तामिळनाडू मुक्त विद्यापीठाच्या पदविका अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. यानंतरही त्यांचा अभ्यास थांबला नाही, तर त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून प्रथम बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (बीसीए) आणि नंतर एमसीए केले. तुरुंगातही तो म्युझिक बँड वाजवतो तुरुंगात असताना तो आपल्या तुरुंगातील साथीदारांसोबत म्युझिक बँड चालवतो. प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्याबद्दल प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांनुसार, तो एक आनंदी व्यक्ती आहे. त्याला लेखन आणि पाश्चात्य संगीताची खूप आवड आहे. रिपोर्ट्सनुसार, तो वेल्लोर जेलमधील एका शाळेत शिक्षक म्हणूनही शिकवत आहे. तो बाकीच्या कैद्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायचा. स्फोटात उपयोगी पडणारी बॅटरी त्याने विकत घेतली होती. पेरारिवलनचे पालक पेरियार यांचे अनुयायी आहेत. पेरुंबदुरच्या येथील राजीव गांधींच्या सभेत स्फोट घडवून आणलेल्या 9 व्होल्टची बॅटरी त्याने विकत घेतल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला. राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या सूत्रधारांच्या तो संपर्कात होता, असा सीबीआयचा दावा आहे. त्याचे एक-दोन मेसेजही मिळाले होते. राजीव गांधी हत्येत त्याची भूमिका नव्हती हे आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे सुटका करण्यात आली.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Crime, Sonia gandhi

  पुढील बातम्या