गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

गोव्याला दुपारी 3 वाजेपर्यंत नवा मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

पणजी, 18 मार्च : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात आता राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा आता दुपारी 3 वाजता शपथविधी होणार असून विधानसभा सभापती प्रमोद सावंत आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले विश्वजीत राणे यांचं नाव देखील चर्चेत आहे. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. प्रमोद सावंत हे व्यवसायानं आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. दरम्यान, काँग्रेसनं देखील आता सत्ता स्थापनेसाठी दावा केला असून गोव्यातील राजकीय घडामोडी या अत्यंत रंजक अशा वळणावर आहेत.

नितीन गडकरी गोव्यात

राज्यातील घडामोड पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी (17 मार्च)रात्रीच गोव्यात दाखल झाले असून भाजप नेत्यांसोबत त्यांच्या रात्रभर बैठका घेत आहेत. नितीन गडकरी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे नेते सुदिन ढवळीकर यांची रात्रभर बैठक सुरू होती. गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असून, त्यात गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे

गोव्यातील संख्याबळ

एकूण जागा : 40

सध्याचे संख्याबळ - 36

भाजप : 12

मगोप - 3

गोवा फॉरवर्ड - 3

अपक्ष - 3

काँग्रेस आघाडी

काँग्रेस : 14

राष्ट्रवादी काँग्रेस- 1

दिगंबर कामतांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळलं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. पण कामत यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावल्याने गोवा सरकार बहुमतात आहे, हे सिद्ध करण्यासााठी दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यासाठी ते दिल्लीवरून गोव्याकडे निघाले आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यावर माझा दिल्लीचा दौरा दोन दिवसांपूर्वीच ठरला होता. त्यामुळे कोणालाही भेटण्याचा प्रश्नच येत नाही. मला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही आणि मी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही, असं कामत यांनी स्पष्ट केलं आहे.

VIDEO: 'चेहऱ्याच्या साम्यामुळे काही काळ मला पर्रिकरांची ओळख मिळाली'

First published: March 18, 2019, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading