कोण असतील गोव्याचे नवे मुख्यमंत्री?

कोण असतील गोव्याचे नवे मुख्यमंत्री?

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी रात्री 63 व्या वर्षी पणजीत त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

  • Share this:

पणजी 17 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच निधन झाल्यानंतर आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली. नव्या नेत्याच्या निवडीसाठी भाजपने हाचचाली सुरू केल्या असून ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गोव्यात येत आहे. त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यात नवा नेता निवडला जाईल. ही निवड झाली तर रात्रीच नवे मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांचं आकस्मिक निधन झाल्यास घटनेनुसार तातडीने नवा मुख्यमंत्री निवडावा लागतो. त्या प्रक्रियेला उशीर झाला तर तात्पुरती राष्ट्रपती राजवटही लावली जाऊ शकते अशीही माहिती आहे. नवा नेता कोण असावा यावर भाजपमध्ये चर्चा सुरू झाली असून अनेक नावांवर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवा नेता निवडताना भाजपच्या मित्रपक्षांना ते नाव मान्य व्हावं याची काळजीही भाजपला घ्यावी लागणार आहे. दरम्यान मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहे. केंद्र सरकारने एक दिवसांचा दुखवटाही जाहीर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह महत्त्वाचे नेते सोमवारी गोव्यात येत आहेत.

मनोहर पर्रिकर यांचं निधन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी निधन झाले. गेली काही महिने गोव्यातच निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 63 वर्षांचे होते. प्रकृती ठीक नसतानाही ते मुख्यमंत्री कार्यालयात कामकाज बघत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. रविवारी त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यासही अडचण होत होती. शेवटी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून पर्रिकरांच्या निधनाची बातमी देत दु:ख व्यक्त केलं.

पर्रिकरांना स्वादुपींडाचा कर्करोग झाला होता. वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतल्या लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सुरुवातीला उपचार झाले. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्येही त्यांच्यावर काही महिने उपचार झाले. नंतर पर्रिकरांना अमेरिकेतून सुट्टी देण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 09:56 PM IST

ताज्या बातम्या