• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • कोण आहे 'हनीप्रीत'? तिने राम रहीमला का दिली साथ ?

कोण आहे 'हनीप्रीत'? तिने राम रहीमला का दिली साथ ?

राम रहीमला अटक झाल्यानंतर त्याला हेलिकॉप्टरने रोहतकला नेतानाही हनीप्रीत त्याच्यासोबत होती. एवढंच नाहीतर जेलमध्येही ती बराचकाळ त्याच्यासोबत होती. पण नंतर सुरक्षा यंत्रणांनी तिला जेलबाहेर जायला सांगितल्यानंतर ती तिथून निघून गेली

  • Share this:
सिरसा, (न्यूज 18) 28 ऑगस्ट : साध्वी बलात्कारप्रकरणी राम रहीमला अटक झाल्यापासून ते त्याला शिक्षा सुनावली जाईपर्यंत हनीप्रीत इन्सान ही शेवटपर्यंत त्याच्यासोबत होती. हनीप्रीत ही रामरहीमची मानलेली मुलगी आहे. राम रहीमला अटक झाल्यानंतर त्याला हेलिकॉप्टरने रोहतकला नेतानाही हनीप्रीत त्याच्यासोबत होती. एवढंच नाहीतर जेलमध्येही ती बराचकाळ त्याच्यासोबत होती. पण नंतर सुरक्षा यंत्रणांनी तिला जेलबाहेर जायला सांगितल्यानंतर ती तिथून निघून गेली . सूत्रांच्या माहितीनुसार सिरसातील सच्चा सौदा आश्रमातही हनीप्रीतच राम रहीम सर्वाधिक जवळची मानली जात होती. राम रहिमच्या मेसेंजर 2 आणि ‘एमएसजी - द वॉरियर लॉयन हार्ट’ या दोन चित्रपटातही तिने भूमिका केलीय. ती स्वतःला राम रहीमची मोठी मुलगी मानते. दरम्यान, हनीप्रीतच्या पतीने मात्र, रामरहीमनेच आपल्या पत्नीपासून दूर केल्याचा गंभीर आरोप केलाय. एवढंच नाहीतर रामरहीम आणि हनीप्रीत यांचे अनैतिक संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. त्यानंतर रामरहीमने सर्वांसमोर ही माझी मुलगी असल्याचं जाहीर केलं होतं. हनीप्रीत या मानलेल्या मुलीसोबतच राम रहीमला चरणप्रीत आणि अमनप्रीत या दोन मुली आणि जसमीत हा मुलगा आहे. या दोघींचीही लग्न झालेत. हरजीत कौर ही राम रहीमची पत्नी आहे. रामरहीमला बलात्कार प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झाल्याने डेरा सच्चा सौदाचा हा सगळा डोलारा नेमकं कोण सांभाळणार याकडे त्याच्या अनुयायांच्या नजरा लागल्यात.
First published: