• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • काँग्रेससाठी रोड शो करणारे हे जटाधारी 'कम्प्युटर बाबा' आहेत तरी कोण?

काँग्रेससाठी रोड शो करणारे हे जटाधारी 'कम्प्युटर बाबा' आहेत तरी कोण?

धुनी पेटवून मधोमध बसलेले जटाधारी कम्प्युटर बाबा स्वतः प्रचाराच्या धामधुमीत उतरले आहेत. दिग्विजय सिंह यांनी त्यांच्यासमोर मांडलेली पूजा आणि त्यांचा रोड शो यामुळे या फेसबुकवरून चॅटिंग करणाऱ्या कॉम्प्युटर बाबांविषयी उत्सुकता वाढली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 8 मे : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भोपाळहून भाजपच्या साध्वी प्रज्ञा यांच्या विरोधात रिंगणात असणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा काँप्युटर बाबांबरोबर पूजाविधी करण्याचा व्हिडिओ कालपासून गाजतो आहे. धुनी पेटवून मधोमध बसलेले जटाधारी कम्प्युटर बाबा स्वतः प्रचाराच्या धामधुमीत उतरल्यामुळे त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झालेली दिसते. मध्य प्रदेशात प्रसिद्ध असलेल्या या कम्प्युटर बाबांनी दिग्विजय सिंहांना पाठिंबा जाहीर केला आहे. या कम्प्युटर बाबांनी दिग्विजय आणि काँग्रेससाठी भोपाळमध्ये रोड शोसुद्धा केला. या रोड शोच्या वेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र 'मोदी...मोदी' अशा घोषणा दिल्या. त्यामुळे हा रोड शो सुद्धा देशभर चर्चेचा विषय झाला. देशाच्या राजकारणात भोपाळ मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. कारण या मतदारसंघात दिग्विजय सिंह यांना भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आव्हान देत आहेत. अशातच आता कॉम्पुटर बाबांनी दिग्विजय सिंहांना पाठिंबा दिल्याने चर्चा वाढली आहे. VIDEO : कम्प्युटर बाबांनी हाती घेतला काँग्रेसचा झेंडा, व्यापाऱ्यांकडून 'मोदी...मोदी'च्या घोषणा साध्वी प्रज्ञांना जिंकवण्यासाठी BJPनं आखली 'ही' मोठी योजना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या  साध्वी प्रज्ञा यांना टक्कर देण्यासाठी आता दिग्विजय सिंह यांनीही साधू संतांचा आसरा घेत या कंप्यूटर बाबांसोबत पूजा अर्चा केली. कम्प्युटर बाबा मूळचे आहेत कोण? गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, कपाळभर अगदी नाकापर्यंत आलेलं गंध असे हे जटाधारी बाबा पांढऱ्या वस्त्रात दिसतात. कम्प्युटर बाबांचं खरं नाव नामदेवदास त्यागी. हे बाबा इतर साधू-संतांपेक्षा जास्त टेक्नोसॅव्ही आहेत. हायटेक आहेत, म्हणून त्यांना कम्प्युटर बाबा असं नाव मिळालं. हायटेक सवयी आणि हेलकॉप्टरने ये-जा करतात हे बाबा ते दिगंबर आखाड्याचे संत आहेत. इंदूच्या अहिल्या नगरमध्ये एका आश्रमात हे बाबा राहतात. एका छोट्या कुटीत राहात असले तरी त्यांची ये-जा होते हेलिकॉप्टरने. कॉम्प्युटर बाबा फेसबुकवरसुद्धा सक्रिय आहेत. ते आपल्या भक्तांबरोबर ऑनलाईन चॅटिंग करत असतात. भाजपकडून काँग्रेसकडे 54 वर्षांचे हे धार्मिक गुरू पहिल्यांदा चर्चेत आले शिवराजसिंह चौहान सरकारवर केलेल्या आरोपांमुळे. खरं तर शिवराजसिंग सरकारमध्येच या बाबांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. नर्मदा संरक्षण समितीचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. पण नर्मदेतल्या उपशाविरोधात त्यांनी आवाज उठवला आणि सरकारविरोधात भूमिका घेतली. VIDEO: कमीत कमी साधू संन्यासींना त्रास देणं सोडा- साध्वी प्रज्ञा VIDEO : साध्वींच्या उमेदवारीवरून जावेद अख्तर भाजपवर भडकले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेसला समर्थन जाहीर केलं. शिवराजसिंह सरकार हटवा, असं आवाहनही त्यांनी त्या वेळच्या प्रचाराच्या वेळी केलं होतं.
  First published: