News18 Lokmat

दिगंबर कामत गोव्याचे मुख्यमंत्री?

गोव्यात आता नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 12:50 PM IST

दिगंबर कामत गोव्याचे मुख्यमंत्री?

पणजी, 17 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालावत आहे. त्यानंतर आता गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसनं आत्ता सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या असून भाजप देखील अधिक सतर्क झालं आहे. पर्रिकरांना पर्यायी नेतृत्व म्हणून आता गोव्यात दिगंबर कामत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दिगंबर कामत तातडीनं दिल्लीला रवाना झाले असून कामत काँग्रेसचे आमदार आहेत. पण, विरोधीपक्ष नेabते चंद्रकांत कवळेकर यांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे. घटक पक्षांचा कामत यांना पाठिंबा मिळू शकतो. अशी शक्यता देखील आता वर्तवली जात आहे.


सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची हालचाल

गोव्यात काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहले आहे. राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने असा दावा केला आहे की भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. राज्यात सर्वाधिक आमदार काँग्रेस सोबत असल्याचे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी दिली पाहिजे. राज्यात राष्ट्रपतीशासन आणता येणार नाही. तर तसे प्रयत्न झाले तर त्याला आव्हान दिले जाऊ शकते असे देखील काँग्रेसचे म्हणणे आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 17 जागांवर तर भाजपने 13 जागांवर विजय मिळवला होता. पण अन्य पक्षांना सोबत घेऊन भाजपने सत्ता मिळवली होती.

Loading...


मनोहर पर्रिकरांची प्रकृती खालावली, गोव्यात सत्ताबदलासाठी हालचालींना वेग


काय म्हणाले होते लोबो

राज्यात काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. तर सत्ताबदलाबाबत बोलताना मायकल लोबो म्हणाले की, गोव्याच्या नेतृत्वात बदल होणार नाही. जोपर्यंत पर्रिकर आहेत तोपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील. त्यांची जागा घेण्याचा दावा कोणीही करणार नाही. आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले. पर्रिकरांचे काही बरे वाईट झाल्यास भाजपचा पुढचा मुख्यमंत्री होईल असे मायकल लोबो शनिवारी म्हणाले होते.



SPECIAL REPORT: सेनेच्या 'या' मतदारसंघात भाजपने केला दावा; नव्या वादाची चिन्हं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 12:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...