निवडणुकीत हा आहे भाजपचा सर्वात तरुण उमेदवार, सोशल मीडियावर क्रेझ

आयटी कंपन्यांचं प्राबल्य असलेला हा मतदारसंघ देशातला एक प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 06:03 PM IST

निवडणुकीत हा आहे भाजपचा सर्वात तरुण उमेदवार, सोशल मीडियावर क्रेझ

बंगळुरू,1 एप्रिल : लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात येतोय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. या प्रचारासोबतच सोशल मीडियावरही प्रचाराचं युद्ध रंगलं आहे. सोशल मीडियावरच्या या चर्चेत जे उमेदवार आघाडीवर आहेत त्यात सर्वात वरच्या स्थानावर आहे तो भाजपचा बंगळुरूमधला 28 वर्षांचा उमेदवार तेजस्वी सूर्या. तेजस्वी हा भाजपचा या निवडणुकीतला सर्वात तरुण चेहेरा समजला जातो.

दक्षिण बंगळुरूची उमेदवारी

तेजस्वी सूर्या याला भाजपने दक्षिण बंगळुरू या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचा हा मतदारसंघ होता. त्यांच्या निधनानंतर ही जागा त्यांच्या पत्नीला दिली जाईल असं म्हटलं जातं होतं. मात्र भाजपने युवा नेत्याची निवड करत सगळ्यांना धक्का दिला. अनंतकुमार हे सलग 6 वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते.

आक्रमक भाषणशैली

तेजस्वी हा भाजपच्या युवा मोर्चाचा प्रमुख आहे. कन्नड, इंग्रजी आणि हिंदीवर त्याचं जबरदस्त प्रभुत्व आहे. आक्रमक भाषणांसाठी तो प्रसिद्ध आहे. आकर्षक व्यक्तिमत्व, भाषेवर प्रभुत्व आणि मोदी- शहांचा विश्वास असल्याने सोशल मीडियावर तेजस्वी सूर्याची चांगलीच क्रेझ आहे. त्याच्या भाषणांचे व्हिडीओ व्हायरल होत असून तरुणांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे.

Loading...

तगडा मुकाबला

कायद्याचा पदवीधर असलेल्या तेजस्वीचा मुकाबला काँग्रेसचे दिग्गज नेते बी.के. हरिप्रसाद यांच्याशी आहे. तेजस्वीला उमेदवारी दिल्याने भाजपचे काही आमदारही नाराज आहेत. मात्र काही मतभेद असले तरी त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही असं तेजस्वीचं म्हणण आहे.  2014 च्या निवडणुकीत भाजपचे अनंतकुमार यांनी काँग्रेसचे उमेदवार नंदन निलेकणी यांचा पराभव केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...