Home /News /national /

कोण आहे भाजपचा Silent Voter? पंतप्रधान मोदींनी केला खुलासा!

कोण आहे भाजपचा Silent Voter? पंतप्रधान मोदींनी केला खुलासा!

दोन जागांवरून भाजपचं कमळ देशभर फुललंय. जे विकासाच्या मुद्यावरून भरकटले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.

    नवी दिल्ली 11 नोव्हेंबर: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिल्लीतल्या भाजपचं मुख्यालया पक्षाने  विजयोत्सवाचं आयोजन केलं होतं. कार्यकर्त्यांच्या उत्साहात पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच पुढचं सरकार असेल असं जाहीर करत चर्चेला पूर्णविराम दिला. पंतप्रधान म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून चर्चा आहे की भाजपचा सायलेंट व्होटर (Silent Voter) कोण आहे? याचं उत्तर मी देता, घरातल्या महिला या भाजपच्या सायलेंट व्होटर आहेत असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान पुढे म्हणाले, भाजपचा हा न दिसणारा आणि न बोलणारा मतदार म्हणजे या देशातल्या माता, भगिनी आहेत. त्या भाजपला वारंवार मतदान करत असतात. त्या माता भगिनांना माझं अभिवादन आहे असंही असं म्हणत त्यांनी त्यांचे आभार मानले. बिहारमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं त्यामुळे भाजपला फायदा झाला असं अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन जागांवरून भाजपचं कमळ देशभर फुललंय. जे विकासाच्या मुद्यावरून भरकटले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहारचा विकास होईल असं सांगत पंतप्रधानांनी सर्वच चर्चेला पूर्णविराम दिला. काही पक्ष हे फक्त कुटुंबांपुरतेच मर्यादीत आहेत अशी टीकाही त्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांची नावे न घेता केली. तरुणांनी भाजपसोबत येत देशाच्या विकासात सहभागी व्हावं असंही ते म्हणाले. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच बिहारची वाटचाल , पंतप्रधानांनी केलं जाहीर देशाच्या विकासासाठी जे प्रामाणिकपणे काम करतील त्यांनाच लोक निवडून देतील. आता विकास हाच मुद्दा यापुढे राहिल हाच या निकालांचा अर्थ आहे असं मोदी म्हणाले. जे विकासापासून दूर जातील त्यांचं लोकांनी डिपॉझिट जप्त केलं असा टोलाही त्यांनी लगावला. देशातल्या सगळ्यांचा भरवसा हा आता फक्त भाजपवरच आहे असंही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुका निकालांचे महत्त्व खूप मोठं आहे. देशभर कमळ खुललं आहे. देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपचा झेंडा लोकांनीच फडकविला आहे. आम्ही फक्त 2 होतो आता देशभर विस्तार झालाय असंही ते म्हणाले. पदवीधर निवडणुका: भाजपनंतर महाविकास आघाडीत सुद्धा बंडखोरी? बिहारमधलं यश हे पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाचं फळ आहे. मतदारांनी सगळे अंदाज खोटे ठरवत लोकशाहीसाठी, विकासासाठी मतदान केलं असंही पंतप्रधानांनी सांगितलं. लोकांनी अतिशय उत्साहाने मतदान केलं. लोकशाहीवरच्या विश्वासाचं हे प्रतिक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या