News18 Lokmat

कोण आहे आसाराम बापू?

स्वयंघोषित गुरू आसारामनं कमी अवधीत आपलं साम्राज्य उभारलं. पाहा आसाराम कोण आहे ते?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:19 PM IST

कोण आहे आसाराम बापू?

25 एप्रिल : लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू २०१३च्या बलात्कार प्रकरणी  दोषी घोषित केलाय. जोधपूरच्या विशेष एससी एसटी कोर्टानं निर्णय दिलाय. आसारामसोबत 2 आरोपीही दोषी असल्याचं शिक्कामोर्तब कोर्टानं केलं. स्वयंघोषित गुरू आसारामनं कमी अवधीत आपलं साम्राज्य उभारलं. पाहा आसाराम कोण आहे ते?

- जन्म - 17 एप्रिल 1941

- जन्मठिकाण - बेरानी, सिंध (आता पाकिस्तानात)

- फाळणीनंतर कुटुंब अहमदाबादच्या मणीनगरमध्ये स्थायिक

- परिवाराचा कोळसा आणि लाकडाचा व्यवसाय

Loading...

- तिसरीत असताना आसारामनं शाळा सोडली

- 1971 - झोपडीतून धार्मिक संदेश देण्यास सुरुवात

- 2 दशकांत आसारामनं साम्राज्य उभारलं

- 2008मध्ये साम्राज्याचं मूल्य 5000 कोटी

- भारतात संत श्री आसाराम ट्रस्टच्या 40 शाळा

- ट्रस्टच्या नावावर शेकडो एकर जमीन

- अमेरिका, कॅनडा, हाँग काँग, दक्षिण आफ्रिकेतही आश्रम

- आयुर्वेद विभागाकडून औषधं आणि साबणाची विक्री

- कुटुंब - पत्नी, मुलगी आणि मुलगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2018 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...