• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Assembly Elections 2021: ममतांची मुस्लीम मतं आपल्याकडे वळवून भाजपला सत्ता मिळवून देऊ शकतात अब्बास सिद्दिकी; काय आहे मतांचं गणित?

Assembly Elections 2021: ममतांची मुस्लीम मतं आपल्याकडे वळवून भाजपला सत्ता मिळवून देऊ शकतात अब्बास सिद्दिकी; काय आहे मतांचं गणित?

West Bengal Assembly Election 2021: कोण आहेत हे अब्बास सिद्दिकी? काँग्रेसबरोबर दोस्ती करणाऱ्या या सिद्दिकींची खरी धास्ती मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी का घेतली आहे?

 • Share this:
  सुजीत नाथ कोलकाता, 5 मार्च :  पश्चिम बंगालच्या (West Bengal) उत्तर 24 परगणा जिल्ह्याच्या राजहाट भागात 45 वर्षं वयाचे हुजाईफा आपल्या घरात एका कोपऱ्यात बसले होते. मातीच्या घरात राहणारे हुजाईफा थोडे थकल्यासारखे वाटत होते. ते केरसुण्या बांधण्याचं काम करतात. जुम्माच्या आधी ते आपलं सारं काम संपवू इच्छितात, जेणेकरून ते थोडी जास्त कमाई करू शकतात. तसं पाहायला गेलं, तर मच्छिमारी हा त्यांचा पेशा. शिवाय ते हस्तकलेचं कौशल्यही त्यांच्याकडे आहे. या सगळ्यातून मिळणाऱ्या पैशांतून ते आपल्या दोन मुली आणि तीन मुलांचं बरं पालनपोषण करू शकतात. हुजाईफा यांची पत्नी खादिगा बिडी बनवण्याचं काम करते. बांधण्यासाठी पसरलेल्या केरसुण्यांपासून थोडं दूर हुजाईफा यांचा मोठा मुलगा इम्रान दुसऱ्या एका मशीनवर काम करत होता. त्या मशीनच्या आवाजाने सगळीकडे कोलाहल माजला होता. त्याच दरम्यान, हुजाईफा यांना शमशाद हुसैन नावाच्या मित्राचा फोन येतो. 'तुम्ही चिंता करू नका. मी भाईजाननाच मत देईन. मी तुमच्याशी संध्याकाळी बोलतो. आता मी थोडा बिझी आहे,' असं बोलून हुजाईफा फोन ठेवतात. हुजाईफा गेली कित्येक वर्षं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) कट्टर समर्थक आहेत. परंतु त्या डाव्या पक्षाचं अस्तित्व जसजसं संपत गेलं, तसतसं हुजाईफा यांच्यासारखे अनेक लोक अब्बास सिद्दीकी (Abbas Siddique) यांच्या लोकप्रियतेकडे आकर्षित होत आहेत. बांगलादेश सीमेवर (Bangladesh Border) राहणाऱ्या लोकांमध्ये अलीकडे सिद्दीकी यांच्याबद्दल विश्वास वाढू लागला आहे. त्यात केवळ मुसलमानच नव्हेत, तर दलित आणि आदिवासींचाही समावेश आहे. 'भाईजान आमचं क्षेमकुशल विचारत राहतात. नशिबाची साथ मिळण्यासाठी त्यांनी आम्हाला तावीजही दिले. आम्ही भाईजान यांच्यासोबत आहोत. कारण हे जग सोडल्यानंतर आम्ही जन्नतमध्ये जाऊ शकू. भारतीय धर्मविरपेक्ष मोर्चाच्या बॅनरखाली ते निवडणूक लढवत आहेत आणि आम्ही त्यांना मतदान करणार आहोत,' असं हुजाईफा म्हणाले. 'मी अनेक वर्षं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (CP (M)) मतदान केलं; पण मुसलमानांच्या कल्याणाच्या दृष्टीने काहीही झालं नाही. तृणमूल काँग्रेसही (TMC) आता तसंच राजकारण करतं आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) तर आता सगळ्या पक्षांमध्ये खतरनाक आहे. त्यामुळे आम्ही अब्बास सिद्दिकी यांचे समर्थक बनलो आहोत. भाईजान यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांना आम्ही मतं देऊ,' असंही हुजाईफा यांनी स्पष्ट केलं. सिद्दिकी कोण आहेत? पीरजादा सिद्दिकी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या फुरफुरा शरीफ दर्ग्याचे प्रमुख आहेत. बंगालमध्ये ते बरेच लोकप्रिय आहेत. हैदराबादचे लोकसभा खासदार आणि एमआयएमचे (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचे आपण चाहते असल्याचं एकदा सिद्दिकी म्हणाले होते. हे वक्तव्य म्हणजे बंगालच्या राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्यांचं एक पाऊल होतं. त्यांचं ते वक्तव्य सत्तारूढ तृणमूल काँग्रेससाठी चिंतेचा विषय बनलं होतं. कारण 2011मध्ये तृणमूल काँग्रेसला मुसलमानांच्या पाठबळावर सत्ता मिळाली होती. सिद्दिकी यांनी कौतुक केल्यामुळे बंगालमधली केवळ राजकीय समीकरणंच बदलली असं नव्हे, तर एमआयएम पक्षालाही पश्चिम बंगालमध्ये नशीब आजमावण्याची संधी उपलब्ध करून दिली. सिद्दिकी यांचा यू-टर्न सिद्दिकी यांनी काही कालावधीनंतर आपल्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला. इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) या त्यांच्या पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीत सहभागी होण्याची घोषणा केली. 'असदुद्दीन ओवैसी यांना तुम्ही धोका का दिलात,' असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'आम्ही त्यांना धोका दिलेला नाही. फुरफुराशरीफमध्ये ते मला भेटायला आले होते. त्यानंतर ते हैदराबादला निघून गेले. त्यानंतर त्यांच्याकडून काहीच बोलणं झालं नाही. एवढंच कशाला, त्यांच्या एखाद्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यानेही माझ्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या बरोबर पुढे जायचं ठरवलं आहे,' असं सिद्दिकी यांनी सांगितलं.

  वाचा -  मोहन भागवतांची मुंबईतील 'ती' भेट ठरली यशस्वी; प.बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप ठरणार गेम चेंजर?

   सिद्दिकी यांचं शिक्षण
  सिद्दिकी यांचा जन्म हुगळीतल्या फुरफुरा शरीफ इथं झाला आणि त्यांनी फुरफुराच्या जवळ रामपारा इथल्या नारायणी स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. वडील अली अकबर सिद्दिकी यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी स्वतःही इस्लामचं शिक्षण घेतलं. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या तेतुलिया मदरशात ते शिकले. त्यांनी हदीस इथल्या आलिया विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केलं. सिद्दिकी यांचे भाऊ नौशाद नव्यानेच तयार झालेल्या भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाचे अध्यक्ष आहेत. तसंच त्यांची आई गृहिणी आहे. मुस्लीम मतांचा मुद्दा पश्चिम बंगालमध्ये जवळपास 31 टक्के मुस्लिम मतदार आहेत. पश्चिम बंगालमध्ये असं म्हटलं जातं, की मुसलमान मतदार ज्या पक्षाच्या दिशेने झुकले, तो पक्ष जवळपास सत्तेत आल्यातच जमा असतं. 2011मध्ये ममता बॅनर्जी यांच्या विजयातही मुस्लिम मतदारांचं मोठं योगदान होतं. जवळपास 90 जागांवर विजय होणार की पराभव हे मुस्लिम मतदारांच्याच हातात आहे आणि याची ममता बॅनर्जींना पूर्णपणे जाणीव आहे. फायदा कोणाला? पश्चिम बंगालमध्ये जवळपास 22 टक्के मुसलमान कोलकाता शहरात राहतात आणि त्यापैकी जवळपास 67 टक्के मुसलमान मुर्शिदाबाद जिल्ह्यात राहतात. उत्तर दिनाजपूरमध्ये 52 टक्के, तर मालदामध्ये 51 टक्के मुसलमान वस्ती आहे. पश्चिम बंगाल हे देशातलं मुस्लिमांची सर्वांत जास्त लोकसंख्या असलेलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. या राज्यात एकूण लोकसंख्येच्या 27.5 टक्के म्हणजे 2.47 कोटी एवढी मुस्लिमांची लोकसंख्या आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 43 टक्के मतं मिळाली. 2014च्या तुलनेत हा आकडा पाच टक्क्यांनी अधिक होता. त्याचं कारण मुस्लिमांचा पाठिंबा हे होतं. 2014मध्ये तृणमूल काँग्रेसला 34 जागांवर विजय मिळवता आला; पण त्यानंतर पाच वर्षांनी त्या पक्षाला केवळ 22 जागाच राखता आल्या. 2016च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस मुस्लिमबहुल 90 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर होती. तसंच, ज्या मतदारसंघांत मुसलमान मतदारांची संख्या 40 टक्क्यांहून अधिक आहे, अशा 65 विधानसभा मतदारसंघांपैकी 60 मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर होती.

  नक्षलवाद सोडून अभिनेता झाला, आता मोहन भागवतांना भेटून पुन्हा राजकारणात?

  दुसरीकडे, त्याच निवडणुकीत भाजपला 12 टक्के मिळाली होती. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी 39 टक्क्यांपर्यंत पोहोचली. प्रामुख्याने हिंदूंचा भाजपकडे कल वाढल्याने ही 27 टक्क्यांची वाढ झाली. यावरून ही गोष्ट लक्षात येते, की आयएसएफ-काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीकडे मुस्लिम मतांचा ओढा थोडा जरी वाढला, तरी ममता बॅनर्जींसाठी केवढी मोठी समस्या उभी राहू शकते. भाईजाननी नंदीग्राममध्येही ममतादीदींविरोधात उमेदवार उभा करण्याटा निर्णय घेतला आहे.
  First published: