काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे? सोनिया गांधी देणार राजीनामा

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे? सोनिया गांधी देणार राजीनामा

एकीकडे राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत, अशावेळी कोण असेल काँग्रेसचा नवा अध्यक्ष?

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट :  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाला नवीन प्रमुखाची निवड करण्याची विनंती केली आहे. त्या राजीनामा (resign) देणार असल्याची चर्चा आहे. सांगितले जात आहे की सोनिया गांधींनी हे स्पष्ट केलं आहे की त्या यापुढे काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावर (Congress president) राहणार नाहीत.

सांगितले जात आहे की, सोनिया गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचा हंगामी अध्यक्षपद स्वीकारले होते. सोमवारी होणाऱ्या काँग्रेस वर्किंग समितीच्या बैठकीत हंगामी अध्यक्ष (Interim President) नियुक्त केल्याचे सांगितले जात आहे. कारण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या अध्यक्षाची नियुक्ती काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीनंतरच केली जाऊ शकते.

सोमवारी होणाऱ्या काँग्रेस वर्किंग समितीच्या (Congress Working Committee) बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काँग्रेसचा हंगामी अध्यक्ष नियुक्त करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून काँग्रेसचे अनेक नेता उघडपणे याची मागणी करीत आहेत. एकदा पुन्हा राहुल गांधी यांना काँग्रेसची (Congress) जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, काँग्रेसच्या 100 टक्के कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की राहुल गांधी पुन्हा पार्टीचं नेतृत्व करावे. बैठकीपूर्वी पार्टीतून अनेकांचा आवाज समोर येत आहे. यानुसार 300 हून अधिक पार्टीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष (interim president) सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. सोनिया गांधींनी या पत्रात सविस्तर वृत्त देत सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदासाठी कार्यक्षम आणि जनतेमध्ये सक्रिया असलेल्या नेत्याची निवड अध्यक्षपदासाठी करावी, असं  लिहिलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 23, 2020, 5:54 PM IST

ताज्या बातम्या