या दोघांनी राहुल गांधींना दिला सल्ला ७२ हजार रुपयांचा सल्ला

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी 'गरिबी हटाव' चा नारा देत गरिबांच्या खात्यात ७२ हजार रुपये भरण्याची घोषणा केली आहे. या किमान उत्पन्न हमी योजनेची आयडिया राहुल गांधींना कोणी दिली ? असा प्रश्न विचारला जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 09:00 PM IST

या दोघांनी राहुल गांधींना दिला सल्ला ७२ हजार रुपयांचा सल्ला

नवी दिल्ली, २५ मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी 'गरिबी हटाव' चा नारा देत गरिबांच्या खात्यात ७२ हजार रुपये भरण्याची घोषणा केली आहे. या किमान उत्पन्न हमी योजनेची आयडिया राहुल गांधींना कोणी दिली ? असा प्रश्न विचारला जात आहे.

'द प्रिंट' या वेबसाइटने काही नेत्यांचा दाखला देऊन याबद्दल एक बातमी दिली आहे. नोबेलविजेते ब्रिटिश अर्थतज्ज्ञ अँगस डिटन आणि फ्रेंच अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी या दोन तज्ज्ञांची ही संकल्पना आहे. या दोघांनीच राहुल गांधींना ही योजना जाहीर करण्याचा सल्ला दिला.

अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांनी याबद्दल एक पुस्तक लिहिलं आहे. औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेली असमानता घालवायची असेल तर काही धनिक लोकांची संपत्ती बाहेर काढून ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायली हवी, अशी संकल्पना त्यांनी या पुस्तकात मांडली आहे.

राहुल गांधींनी याबद्दल संशोधन करण्याची जबाबदारी काही लोकांवर सोपवली होती. याच प्रक्रियेमध्ये त्यांच्या हाती हे पुस्तक लागलं आणि या योजनेवर चर्चा सुरू झाली.

नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अँगस डिटन यांनीही संपत्तीच्या असमान वाटपावर संशोधन केलं आहे. गरिबी निर्मूलन आणि आरोग्यक्षेत्रातही त्यांचं योगदान आहे. भारताच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी संशोधन केलं आहे.

Loading...

या तज्ज्ञांनी सुचवलेली ही संकल्पना आदर्श असली तरी ती प्रत्यक्ष व्यवहारात कशी उतरवणार हा प्रश्न मात्र विचारला जात आहे. किमान उत्पन्नाची हमी देत दारिद्र्यरेषेखालच्या कुटंुबांना महिन्याला ६ हजार रुपये देण्यात येतील, असं राहुल गांधींनी जाहीर केलं आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.


==========================================================================================================================

शिवसेनेचे राज्यमंत्री चक्क आदित्य ठाकरेंच्या पाया पडले, VIDEO व्हायरल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...