कार्यकर्त्याच्या हत्येने दु:खी झालेल्या स्मृती इराणींनी घेतली ही प्रतिज्ञा

कार्यकर्त्याच्या हत्येने दु:खी झालेल्या स्मृती इराणींनी घेतली ही प्रतिज्ञा

'हत्याऱ्यांना शोधून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ही कसली प्रेमाची भाषा'

  • Share this:

अमेठी 26 मे : अमेठीतले भाजपचे कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणी यांचे सचिव सुरेंद्र सिंह यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली. इराणी या आज बरैलिया गावात आल्या आणि त्यांनी सिंह यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्या. एवढच नाही तर त्यांनी सिंह यांच्या पार्थिवाला खांदा सुद्धा दिला. सिंह यांची हत्या करणारा आणि त्याच्या हत्येचा आदेश देणाऱ्याला फाशीची शिक्षा झाल्याशीवाय स्वस्थ बसणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञाच घेतली. या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं तर मी सुप्रीम कोर्टातही जाईल असंही त्या म्हणाल्या.

स्मृती इराणी त्यांच्या अंत्ययात्रेला पोहोचल्या. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. भाजप ठामपणे सिंह यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे असंही त्यांनी सांगितलं. याप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांच्या माजी सचिवाची हत्या गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामो पोलीस ठाण्याच्या परिसरात बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली.

लोकसभा निवडणुकीचा निकाल तीनच दिवासांपूर्वी लागला होता. यात इराणी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच अमेठी मतदारसंघ चर्चेत होता. त्यानंतर इराणी यांच्या विजयामुळे तो पुन्हा चर्चेत आला. आता निकालानंतर सिंह यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सुरेंद्र सिंह घराबाहेर झोपले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी रात्री सुरेंद्र सिंह जेव्हा घराबाहेर झोपले होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सिंह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी त्यांना लखनऊ येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले. लखनऊला घेऊन जाताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बारौलिया गावात खळबळ उडाली आहे. या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांशी चर्चा करुन हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत.

सिंह यांच्या हत्येमुळे बारौलिया गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 06:25 PM IST

ताज्या बातम्या