सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय #BoycottMillennials, हे 'मिलेनियल्स' आहेत तरी कोण ?

सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय #BoycottMillennials, हे 'मिलेनियल्स' आहेत तरी कोण ?

'मिलेनियल्स' हे Ola आणि Uber सारख्या खाजगी कार सर्व्हिसचा विचार करतात त्यामुळे वाहनखरेदी कमी झाली आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर #BoycottMillennials हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कारउद्योगातल्या मंदीला 'मिलेनियल्स' ना जबाबदार धरलं. या 'मिलेनियल्स' ची मानसिकता बदलल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं त्या म्हणाल्या. 'मिलेनियल्स' हे Ola आणि Uber सारख्या खाजगी कार सर्व्हिसचा विचार करतात त्यामुळे वाहनखरेदी कमी झाली आहे, असं त्या म्हणाल्या.निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर #BoycottMillennials हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

मिलेनियल्स म्हणजे कोण ?

मिलेनियल्स या श्रेणीत तरुणांचा समावेश होतो. अमेरिकेच्या जनगणनेच्या आकड्यांनुसार जगभरात मिलेनियल्स ची संख्या एक चतुर्थांश आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जगभरात तरुणांची संख्या एक चतुर्थांश आहे.

1980 किंवा 1982 ते 2000 या काळात जन्मलेले सगळेजण एकविसाव्या शतकात तारुण्याच्या उंबरठ्यावर होते. भारतातही अशा तरुणांची संख्या जास्त आहे. त्यांनाच 'मिलेनियल्स' म्हणतात.

या तरुणांची काही खास वैशिष्ट्य सांगितली जातात.

१. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातले हे तरुण बुद्धिमान आणि तंत्रज्ञानामध्ये कुशल असतात.

2. हे तरुण वैयक्तिक स्वातंत्र्य महत्त्वाचं मानतात.

3. त्यांना जास्त संतुलित जीवनशैली हवी असते.

4. वेगवेगळ्या कंपन्या आणि सर्व्हिस इंडस्ट्रीबद्दल त्यांना चांगली माहिती असते.

5. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत ते जास्त जागरुक असतात.

एकूण सांगायचं झालं तर ही युवापिढी मागच्या पिढीपेक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जास्त समज असलेली पिढी आहे, असं मानलं जातं. आता हीच पिढी जगाचं भविष्य घडवणार असल्याने त्यांच्याबद्दल वारंवार चर्चा होत असते.

=========================================================================================

SPECIAL REPORT : मनसे उतरणार निवडणुकीच्या मैदानात, असा असू शकतो प्लॅन?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 08:52 PM IST

ताज्या बातम्या