मराठी बातम्या /बातम्या /देश /

अदार पूनावालांचा विजय, Covovax लसीसंदर्भात WHO ने घेतला मोठा निर्णय

अदार पूनावालांचा विजय, Covovax लसीसंदर्भात WHO ने घेतला मोठा निर्णय

ओमायक्रॉन (omicron Variant) व्हेरिएंटनं  सर्वांची चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यातच एक चांगली बातमी समोर येत आहे.

ओमायक्रॉन (omicron Variant) व्हेरिएंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यातच एक चांगली बातमी समोर येत आहे.

ओमायक्रॉन (omicron Variant) व्हेरिएंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यातच एक चांगली बातमी समोर येत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 18 डिसेंबर: सध्या कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) ओमायक्रॉन (omicron Variant) व्हेरिएंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यातच एक चांगली बातमी समोर येत आहे. ओमायक्रॉन धोक्याच्या दरम्यान WHO ने सीरम इन्स्टिट्यूटची (Serum Institute) लस, Covovax ला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. अदार पूनावाला (Adar Poonawala) यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितलं की, कोरोनाच्या लढाईत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. Covovax लस अधिक प्रभावी आणि सुरक्षित आहे.

WHO ने Covovax लसीसाठी आपत्कालीन वापरास दिली मान्यता

कोवोव्हॅक्स लस सिरमनं नोव्हावॅक्स कंपनीच्या सहकार्याने तयार केली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व चाचण्यांमध्ये ही लस खूप प्रभावी ठरली आहे. या कारणास्तव, WHO ने आपत्कालीन वापरासाठी नवव्या लसीला परवानगी दिली आहे. WHO चं म्हणणं आहे की, कमी उत्पन्न असलेल्या देशांना या लसींचा खूप फायदा होईल आणि अल्पावधीत जलद लसीकरण होईल.

या संदर्भात, WHO च्या डॉ. मारिएंजेला सिमाओ ( Dr Mariangela Simao) म्हणतात की, नवीन व्हेरिएंटमध्ये लस हे एकमेव प्रभावी साधन आहे जे लोकांना गंभीर आजारांपासून वाचवू शकते. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लसीकरणाची स्थिती सुधारण्यासाठी कोवोव्हॅक्स लसीचा परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा- Air Pollution चा नियमित व्यायाम करणाऱ्यांवरही होतो असा परिणाम; नवीन संशोधनातील माहिती

त्यांच्या मते, 41 देश असे आहेत जिथे 10 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण अजूनही सुरू आहे. तर 98 देश असेही समोर आले आहेत जिथे 40 टक्क्यांच्या आकड्याला स्पर्शही झालेला नाही.

पूर्ण परवान्यासाठी आता प्रतीक्षा

काही काळापूर्वी नोव्हावॅक्स-एसआयआयची ही लस इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. कोवोव्हॅक्स लस कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कोवोव्हॅक्स लसीबद्दल सांगायचे तर, ते 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवता येते. या लसीचे दोन डोस दिल्यावर त्याचा अधिक परिणाम होईल. सीरमच्या या लसीला तेव्हाच हिरवा झेंडा दाखवण्यात आला जेव्हा याच्या फेज 2 आणि 3 च्या ट्रायलच्या निकालांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

हेही वाचा-  Omicron डेल्टा व्हेरियंटपेक्षा 70 पट वेगाने पसरतो! फुफ्फुसांसाठी किती धोकादायक? जाणून घ्या

 बर्‍याच संशोधनानंतर, अनेक तज्ज्ञ आणि डब्ल्यूएचओ टीमने आपत्कालीन वापरासाठी कोवोव्हॅक्स लसीला परवानगी दिली आहे. मात्र आता संपूर्ण परवान्यासाठी कंपनीला लसीशी संबंधित आवश्यक डेटा WHO ला सतत द्यावा लागेल.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus