तिहेरी तलाकवर लोकसभेत होणार चर्चा, भाजपचं व्हिप जारी

तिहेरी तलाकच्या चर्चेतून मुस्लीम महिलांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2018 06:01 PM IST

तिहेरी तलाकवर लोकसभेत होणार चर्चा, भाजपचं व्हिप जारी

नवी दिल्ली 25 डिसेंबर : तिहेरी तलाकवर गुरुवारी म्हणजे 27 डिसेंबरला लोकसभेत चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने खासदारांना व्हिप जारी केलाय. सर्व खासदारांनी दोन दिवस संसदेत उपस्थित राहावं असा आदेश भाजपने काढला आहे. लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त चार महिने राहिले आहेत. त्यामुळं लोकसभेत होणाऱ्या चर्चेतून आपापल्या मतदारांना योग्य संदेश देण्याचं काम राजकीय पक्ष करणार आहेत. तर मुस्लीम महिलांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.


तिहेरी तलाकला गुन्हा ठरविणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 सप्टेंबरला मंजुरी दिली होती. तिहेरी तलाक विधेयक लोकसभेने मंजूर केलं होतं मात्र राज्यसभेत ते मंजूर होऊ शकलं नाही. त्यामुळे सरकाने अध्यादेशाचा पर्याय स्वीकारला. राज्यसभेत भाजपला बहुमत नसल्यानं हे विधेयक रखडलं आहे.


या अध्यादेशात मुस्लिम महिला विधेयकामध्ये असलेल्या सर्व तरतुदींचा समावेश आहे. राज्यसभेत सरकारकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने या विधेयकाला मंजुरी मिळणं सध्यातरी शक्य नव्हतं त्यामुळे सरकारनं अध्यादेशाचा मार्ग स्वीकारला आहे. या विधेयकाच्या समिक्षेची आणखी गरज असून संसदेच्या संयुक्त समितीकडे अभ्यासासाठी हे विधेयक पाठवावं अशी काँग्रेसची मागणी आहे.

Loading...


तर भाजप त्यासाठी तयार नाही. काँग्रेसच्या विरोधामुळे हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलं नाही. या अध्यादेशानुसार तोंडी, लिखित किंवा फोनवर पतीने पत्नीला तलाक दिल्यास त्याला तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या अध्यादेशात आहे. मुस्लीम महिलांना या विधेयकाचा फायदा मिळणार आहे. तर अनेक मुस्लीम संघटनांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला होता.


कायदा करण्याचा अधिकार हा संसदेलाच असून अध्यादेश काढला जावू नये असं मत सुप्रीम कोर्टानं मागच्या वर्षी व्यक्त केलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना सरकारने हा अध्यादेश आणून मुस्लीम महिलांमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 06:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...