Home /News /national /

अमेरिकेत बसून भारतातील पत्नीला संपवलं; हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

अमेरिकेत बसून भारतातील पत्नीला संपवलं; हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

Wife Murder in India: अमेरिकेत (America) बसून पतीने (Husband) तामिळनाडूत राहणाऱ्या पत्नीची हत्या (wife murder) केली आहे. या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

    चेन्नई, 26 मे: अमेरिकेत (America) बसून पतीने (Husband) तामिळनाडूतील पत्नीची हत्या (wife murder) घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या आरोपी पतीनं आपल्या मेव्हुण्याच्या मदतीनं सुपारी देवून पत्नीचा काटा काढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाच्या टोळीला अटक केली. मृत जयाभारती आपल्या दुचाकीनं कार्यालयातून घरी जात असताना, आरोपीनी भरधाव ट्रक चालवत त्यांना चिरडलं आहे. तसेचं हा निव्वळ अपघात असल्याचं भासवलं आहे. पण त्यांचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी काही तासांतच हत्येचं गूढ उलगडलं आहे. संबंधित घटना तामिळनाडूतील तिरुवरुर परिसरातील किदरकोंडम याठिकाणी घडली आहे. मृत जयाभारती 21 मे रोजी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने कामावरुन घरी जात होत्या. यावेळी  कदवैयारु पुलावर विरुद्ध दिशेनं येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक मारली. या घटनेनंतर वाहन चालकानं घटनास्थळावरुन धूम ठोकली. हत्येच्या हेतूने केलेल्या या अपघातात जयाभारती रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. अपघाताचा मोठा आवाज ऐकल्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी जयाभारती यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान जयाच्या कुटुंबीयांना या अपघाताबाबत शंका आल्यानं त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पहाणी केली. त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती घेतली. या माहितीच्या आधारावर मृताच्या कुटुंबींयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं असून या घटनेचे धागेदोर अमेरिकेपर्यंत जोडले आहेत. हे ही वाचा-आई की राक्षसीन; अनैतिक संबंधामध्ये अडचण ठरणाऱ्या 26 वर्षीय मुलाचा केला खून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जयाभारती यांचं 2015 मध्ये विष्णूप्रकाश नावाच्या एका व्यक्तीसोबत विवाह झाला होता. मागील पाच वर्षांपासून विष्णूप्रकाश अमेरिकेत एका आयटी कंपनीत नोकरी करत आहेत. जयाही आपल्या पतीसोबत अमेरिकेतचं राहत होती. मात्र दोघांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर ती भारतात परत आली. याठिकाणी दोघांच्या नातेवाईकांनी यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण याचा फारसा फायदा झाला नाही. शेवटी जया यांनी पतीला घटस्फोटासाठी नोटीस बजावली. हे ही वाचा-आईला का मारलं, मुलाने बापावर कोयत्याने केले सपासप वार, बीड हादरलं! पण घटस्फोट झाल्यानंतर पोडगी द्यावी लागेल याच्या भीतीनं त्यानं आपल्या  मेव्हुण्याच्या मदतीनं एका ट्रक चालकांच्या टोळीला सुपारी देऊन जयाची हत्या घडवून आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक मालक सेंठीकुमारसह जगन, प्रसन्न आणि राजा अशा चार जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, United States of America, Wife

    पुढील बातम्या