नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : भगवान रामाचे जन्मस्थळ अयोध्या (Ayodhya) येथे राजकीय नेते आणि अभिनेत्यांनी साकरलेली रामलीला (Ramlila) सुरू आहे. भाजप खासदार आणि भोजपुरी स्टार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यामध्ये बाली पुत्र अंगदची (Angand) भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मनोज तिवारी (Manoj Tiwari) रंगमंचावर रावणाची भूमिका साकारणाऱ्या शाहबाज खानसोबत संवाद करीत आहे. मात्र यादरम्यान ते असं काही म्हणाले की ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांना रामलीलाच्या (Ramlila) या व्हिडीओमध्ये ते रावणाच्या संवादानंतर म्हणतात...'एक सेकंद-एक सेकंद'. त्यांच्या या एक सेकंदवर वापरकर्त्यांनी त्यांना खूप ट्रोल केलं आहे. अयोध्येत सुरू असलेल्या या रामलीलाची सांगता शनिवारी होईल.
राज्याचे सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग तथा अयोध्या शोध संस्थानच्या सहकार्यामुळे योजिली गेलेली रामलीला आकर्षणाचे केंद्र आहे. कोविड-19 च्या प्रोटोकॉलनुसार रामलीलाच्या ऑनलाइन प्रसारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडिया आणि यूटयूबवर याचं प्रसारण केलं जात आहे. हिंदीशिवाय इंग्रजी, भोजपुरी, तमिल, तेलुगू, कन्नड़, मराठी, पंजाबी, उर्दू, राजस्थानी, हरियाणवी, बांग्लासह एकूण 14 भाषांमध्ये याचं प्रसारण केलं जात आहे