मराठी बातम्या /बातम्या /देश /

कृपया इकडे लक्ष द्या! तुम्हाला देशभरात प्रवास करायचा असेल तर हे वाचाच!

कृपया इकडे लक्ष द्या! तुम्हाला देशभरात प्रवास करायचा असेल तर हे वाचाच!

लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष रेल्वेची तिकिटे आता तत्काळ उपलब्ध होणार आहेत

मिलिंद भागवत/ मुंबई, 29 जून : लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष रेल्वेची तिकिटे आता तत्काळ उपलब्ध होणार आहेत. 12 मेपासून सुरु असलेल्या 15 राजधानी रेल्वे आणि 1 जूनपासून सुरु झालेल्या 100 विशेष रेल्वेंचा यात समावेश आहे.

कसे कराल तत्काळ रेल्वे तिकिट बुकिंग

तत्काळ तिकिटाचे बुकिंग हे वेबसाईट, मोबाइल App यासह रेल्वे स्टेशनवरील आरक्षणाचे तिकीट काऊंटर, पोस्ट ऑफिस यासह अधिकृत एजंट्स यांच्या माध्यमातून करता येणार आहे.

तत्काळ तिकिटाचे बुकिंग करण्यासाठी प्रवाशांजवळ कोणते तरी एक ओळखपत्र असणे हे बंधनकारक आहे. जर प्रवास करणाऱ्यांची संख्या एकापेक्षा जास्त असेल तर कुणाही एकाचे ओळखपत्र असणे हे गरजेचे आहे. पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, वोटर आयडी, बँकेचे पासबुक, शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र, केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्याचे ओळखपत्र यापैकी काहीही असेल तरी ते ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाईल.

प्रवाशांनी जर तत्काळ तिकीट कन्फर्म केले आणि त्यानंतर ते रद्द केले तर त्या तिकिटाचे कोणतेही पैसे प्रवाशांना परत दिले जात नाहीत. मात्र रेल्वे काही कारणांमुळे रद्द झाली किंवा प्रवासी प्रवास करणाऱ्या स्टेशनाव्यतिरिक्त इतर मार्गावरुन वळविण्यात आली, तर मात्र रद्द झालेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे रेल्वेकडून परत केले जातात.

First published:

Tags: Indian railways