या पक्षाच्या बँक खात्यात आहेत सगळ्यात जास्त पैसे

या पक्षाच्या बँक खात्यात आहेत सगळ्यात जास्त पैसे

निवडणुकीच्या काळात उमेदवारांची संपत्ती, पक्षाकडे असलेला निधी याची सगळ्यात जास्त चर्चा होते. कोणत्या पक्षाकडे बँकेत किती पैसे आहेत याची चाचपणी निवडणूक आयोगाने केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : निवडणुकीच्या काळात उमेदवारांची संपत्ती, पक्षाकडे असलेला निधी याची सगळ्यात जास्त चर्चा होते. यावेळी निवडणुकांच्या धामधुमीत कोट्यवधी रुपये जप्तही करण्यात आले. पण कोणत्या पक्षाकडे सगळ्यात जास्त बँक बॅलन्स आहे म्हणजेच कोणत्या पक्षाकडे बँकेत किती पैसे आहेत याची चाचपणी निवडणूक आयोगाने केली.

बँकखात्यात 669 कोटी

या यादीत भाजप वरच्या स्थानावर असेल असं तुम्हाला वाटेल पण भाजप नव्हे तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाकडे बाकी कोणत्याही पक्षापेक्षा जास्त बँक बॅलन्स आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीनुसार, बहुजन समाज पक्षाच्या बँकखात्यात एकूण 669 कोटी रुपये आहेत. त्यासोबतच आपल्याकडे सुमारे एक कोटी रुपयांची रोकड आहे, असही बसपाने जाहीर केलं.

देशातल्या सगळ्यात राजकीय पक्षांनी आपल्याकडच्या पैशांचा हिशोब 25 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला दिला. बहुजन समाज पक्षाच्या खालोखाल समाजवादी पक्षाचा नंबर लागतो. समाजवादी पक्षाकडे 471 कोटी रुपये आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामधल्या निवडणुकांनंतर या पक्षाच्या ठेवींमध्ये 11 कोटी रुपयांची घट झाली.

काँग्रेसचा क्रमांक कितवा ?

सगळ्यात जास्त पैसे असलेल्या या यादीत काँग्रेसचा तिसरा क्रमांक लागतो. काँग्रेसच्या बँक खात्यात 196 कोटी रुपये आहेत. ही आकडेवारी कर्नाटक निवडणुकांनंतर सादर झालेल्या अहवालावर आधारित आहे. महत्त्वाचं म्हणजे आघाडीवर असलेल्या या तिन्ही पक्षांमध्ये भाजपचा समावेश मात्र नाही.

कुणाचा खर्च सगळ्यात जास्त?

भाजप या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भाजपकडे 82 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. भाजपला मिळालेला निधी आणि निवडणुकीच्या बाँडमधून मिळालेले पैसे यापेक्षा अधिक आहेत. पण तरीही भाजप इतक्या खालच्या स्थानावर असण्याचं एक कारण आहे.

निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात भाजपने आपला 758 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा केला आहे. एखाद्या पक्षाने केलेल्या खर्चामध्ये भाजपचा सर्वात वरचा नंबर लागतो. 2017-18 मध्ये भाजपने 1 हजार 27 कोटी रुपये जमवले होते.

खात्यात 100 कोटी

भाजपने इनकम टॅक्सला दिलेली आकडेवारी पाहिली तर पक्षाचे बहुतांश पैसे निवडणूक निधीतूनच जमा झाले आहेत. या पक्षाने निवडणुकीसाठीच्या बाँड्समधून हे पैसे जमवले. कम्युनिस्ट पक्षानेही मागच्या वर्षीचं आपलं उत्पन्न 100 कोटी असल्याचं म्हटलं आहे. यातले बरेचसे पैसे निवडणूक निधीतून आल्याचं पक्षाचं म्हणणं आहे.

================================================================================================================================================================

VIDEO: प्रवाशांनो सावधान! 'जेट' आलं जमिनीवर

First published: April 15, 2019, 4:02 PM IST

ताज्या बातम्या