जे भाजपने गोवा-मणिपूरमध्ये केलं, त्याचा काँग्रेसकडून कर्नाटकात बदला ?

याआधी गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीतही या पेक्षाही किचकट परिस्थिती निर्माण झाली होती

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 15, 2018 05:50 PM IST

जे भाजपने गोवा-मणिपूरमध्ये केलं, त्याचा काँग्रेसकडून कर्नाटकात बदला ?

15 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला खरा पण काँग्रेस आणि जेडीएसने हातमिळवणी करून सत्तेसाठी हालचाल सुरू केलीये. पण, याआधी गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीतही या पेक्षाही किचकट परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा भाजपने मोठ्या शिताफीने सत्ता स्थापन केली.

गोव्यात काय घडलं ?

गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.  काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. तर भाजप दुसऱ्या स्थानावर फेकलं गेलं. भाजपला 13 जागा मिळाल्यात. त्यामुळे बहुमतासाठी 21 जागेचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत दोन्ही पक्षांना होती. भाजपने मगोप ३, गोवा फॉर्वर्ड ३ आणि २ अपक्षांना घेऊन २१ आकडा गाठत सत्ता स्थापन केली.

गोव्यात भाजपचं समिकरण

भाजप १३ मगोप ३ गोवा फॉर्वर्ड ३ २ अपक्ष = २१

Loading...

मणिपूर विधानसभेमध्ये एकूण 60 जागा आहेत. यापैकी काँग्रेसला 28 जागा मिळाल्या तर भाजपला 21 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 31 आमदारांची आवश्यकता होती. भाजपला नॅशनल पीपल्स पार्टी ( एनपीपी) आणि एलजेपी यांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला. हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटक पक्ष होती.  एनपीपीला 4 जागा आणि एलजेपीची 1 जागेच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या 26 जागा झाल्या. पण बहुमत सिद्ध करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता होती. अजून भाजपला 5 जागांची गरज होती.

भाजपने नगा पिपल्स फ्रंटच्या समर्थनाचा दावा केलाय.  त्यामुळे 5 जागांचाही व्यवस्था झालीये. त्यानंतर काँग्रेसचा एक आमदार आणि तृणमूल काँग्रेसचा एकमेव आमदारही भाजपच्या गळाला लागलाय. त्यामुळे भाजपने 32 जागांवर दावा ठोकला होता.

मणिपूरमध्ये  भाजपचं सत्तेचं गणित

भाजप  21 एनपीपी 4 एलजेपी 1 नगा पिपल्स फ्रंट 4

तृणमूल काँग्रेस 1 अपक्ष 1 = एकूण 31

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2018 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...