मराठी बातम्या /बातम्या /देश /कॅमेरा कुठे आहे? अॅमेजॉनवरुन ऑर्डर केला दीड लाखांचा कॅमेरा, काय आलं पाहा हा VIDEO

कॅमेरा कुठे आहे? अॅमेजॉनवरुन ऑर्डर केला दीड लाखांचा कॅमेरा, काय आलं पाहा हा VIDEO

अनेकांना अनबॉक्सिंग करताना व्हिडीओ करण्याची आवड असते.  अॅमेजॉनच्या ग्राहकाचे या अनबॉक्सिंग व्हिडीओमुळे दीड लाग रुपये वाचले.

अनेकांना अनबॉक्सिंग करताना व्हिडीओ करण्याची आवड असते. अॅमेजॉनच्या ग्राहकाचे या अनबॉक्सिंग व्हिडीओमुळे दीड लाग रुपये वाचले.

अनेकांना अनबॉक्सिंग करताना व्हिडीओ करण्याची आवड असते. अॅमेजॉनच्या ग्राहकाचे या अनबॉक्सिंग व्हिडीओमुळे दीड लाग रुपये वाचले.

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : वैश्विक महासाथ कोरोना (Global Epidemic Corona) मुळे देशातील अनेक भागात लॉकडाऊन अद्याप सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे. व्हायरसच्या संपर्कातून बचाव करण्यासाठी या दिवसात लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग करीत आहेत. मात्र या ऑनलाइन शॉपिंगमध्येही हैराण करणारी एक बातमी समोर आली आहे. सुमित चौहान यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग करीत कॅमेरा मागविला होता. सुमित यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनमधून कॅमेरा मागविला होता.

सुमितने 27 ऑगस्ट रोजी अॅमेझॉनवरुन आपल्या क्रेडिट कार्डावरुन 1.40 लाखांचा कॅमेरा बुक केला होता. कॅमेरा जेव्हा घरी आला तेव्हा त्याने तोंडात बोटंच घातली. अॅमेजॉनहून डिलीव्हरी झालेले बॉक्समध्ये जुने शूट आणि दगड होते. यामध्ये चांगली बाब म्हणजे सुमितने अॅमेजॉनच्या पॅकेटची अनबॉक्सींगचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ज्यामध्ये बॉक्स उघडला तेव्हा त्यात कॅमेरा नव्हता तर फाटलेले जुने शूज आणि दगड होते.

पॅकेटमध्ये फाटलेले शूट आणि दगड मिळाल्यानंतर सुमितने पॅकेटवर दिलेल्या डीलरच्या नंबरवर फोन केला. ज्यावर सुमितने डिलरला उत्तर दिलं की त्यांच्याकडून खरा कॅमेरा पाठविण्यात आला होता. डीलरचं उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी अॅमेजॉनशी संपर्क केला. अनेकदा इमेल केल्यानंतर अॅमेजॉनने उत्तर दिलं की ते या प्रकरणाचा तपास करीत आहे. ग्राहकांच्या या अनुभवासाठी त्यांनी माफी मागितली आहे.

First published:
top videos