दिल्ली जळत असताना राहुल गांधी कुठे आहेत? काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत अनुपस्थिती

दिल्ली जळत असताना राहुल गांधी कुठे आहेत? काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत अनुपस्थिती

तीन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार भडकलेला असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते असा सवालही सोनिया गांधी यांनी विचारला आहे. मात्र काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अनुपस्थित असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

  • Share this:

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी :  काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतल्या हिंसाचाराला भाजपला जबाबदार धरलं आहे. त्याचप्रमाणे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार भडकलेला असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते असा सवालही त्यांनी केला. मात्र काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अनुपस्थित असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. ते परदेशात असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र अंत्यत महत्त्वाच्या विषयावर बैठक असाताना राहुल गांधींची अनुपस्थिती विरोधकांच्या नजरेतून न सुटणारी आहे. दिल्लीतील हिंसाचार सुनियोजित कट असून भाजपच त्याला जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. काँग्रेसच्या कार्यसमितीची आज बैठक झाली आणि त्यात दिल्लीतल्या हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हा मोठा हल्ला केला.

(हेही वाचा-सोनिया गांधी अॅक्शनमध्ये, 20 जणांच्या मृत्यूनंतर अमित शहांना विचारले थेट प्रश्न)

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर सोनिया गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दिल्ली पोलिसांवर देखील हल्लाबोल केला. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ए.के. अँटनी, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम आणि प्रियांका गांधी हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पण राहुल गांधी या बैठकीत नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

'काँग्रेसला सक्रिय नेत्तृत्वाची गरज'

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते शशी थरूर यांनी पक्षाच्या नेतृत्वाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार नसतील तर काँग्रेसला त्यांच्या जागी एका सक्रिय आणि पूर्णकालीन नेत्याची गरज आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या (CWC) च्या निवडणुकीमुळे काँग्रेसमध्ये उत्साही टीम तयार होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. दिल्लीतील पराभवानंतर काँग्रेसला एका उत्तम नेत्तृत्वाची गरज आहे. देशातील राजकारणात जोमाने परतण्यासाठी नेत्तृत्वाचा मुद्दा आधी सोडवणं गरजेचं असल्याचंही थरूर म्हणाले

First published: February 26, 2020, 4:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या